मित्रांनो!, झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील अनेक मालिका दिवसेंदिवस रंजक बनत चालल्या आहेत, त्यामुळे रसिक देखील फार उत्सुक झाले आहेत. झी मराठी वरील सर्व मालिका खूप आकर्षून घेतात, तसेच त्यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय तर अप्रतिम आहे. मनाला गुंतुवून ठेवणारा आहे, त्यांच्या भूमिका आणि त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षकांना त्यांची खूप सवय झाली आहे. देवमाणूस ही अशीच एक लोकप्रिय मालिका.

आता काही काळ ही लोकप्रिय मालिका मात्र रसिक प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या उंबरठयावर असल्याची चर्चा आहे. पण आता मात्र या मालिकेत एका नवीन अभिनेत्रीचा चेहरा झळकताना पाहायला मिळतोय. ती डॉक्टरकडे चेकपसाठी आली आहे डॉक्टरचा व्हिडिओ टीव्हीवर पाहून ती इथवर आल्याचं तिने सांगितलेले आहे. पण हि नवी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तुम्ही ह्या अभिनेत्रीला ह्या पूर्वी देखील पाहिलंय.

ही अभिनेत्री आहे “संजना काळे”. संजना हि ऍक्टर, डान्सर, कॉरोग्राफर म्हणून ओळखली जाते. संजना काळे कलर्स मराठीवरील “बाळुमामाच्या नावानं चांग भलं”, फक्त मराठी वरील “सप्तपदी” ह्या मालिकांत काम केले आहे. याशिवाय तिने गेट टू गेदर ह्या चित्रपटात हि महत्वाची भूमिका बजावली आहे. देवमाणूस मालिकेमुळे तिला आता नवी ओळख आणि प्रसिद्धी मिळणार हे नक्की.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjana Kale 🎭 (@sanjanaaa_13)

ह्या आधीही अनेक अभिनेत्रींना देवमाणूस मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मालिका इतक्यात संपणार नसल्याचं अभिनेता किरण गायकवाड ह्याने नुकतंच लाईव्ह येऊन सांगितलं होत. आता ह्या अभिनेत्रींच्या येण्याने मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण होणार हे नक्की. मालिका अजून बरेच दिवस चालणार अस चित्र तरी निर्माण होताना पाहायला मिळतेय.

आता या मालिकेमुळे संजनाला पुन्हा एकदा विशेष ओळख व लोकप्रियता प्राप्त होणार हे नक्की आहे, कारण ही मालिका आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांगलीच गाजत आहे त्यामुळे यातील सर्व कलाकार देखील सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत. मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच संजनाची एन्ट्री झाली आहे त्यामुळे या मालिकेने वेगळे वळण घेतले असून अजून तरी ही मालिका आणखीन खुलणार हे पक्के आहे.

या मालिकेत संजना येणार म्हटल्यावर तीच्या चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे, आता पुन्हा ही मालिका कसे वळण घेणार याचीच उत्सुकता सर्व चाहत्यांच्या मध्ये निर्माण झाली आहे. संजनाच्या अभिनयाची झलक आता पुन्हा पाहायला मिळणार आहे.