मित्रांनो!, मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठी वाहिनी ही नेहमीच नवनवीन मालिका तसेच रियालिटी शो घेऊन येत असते. परंतु सध्या मात्र झी मराठी वरील बहुतेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्यातील एक म्हणजे “अग्गबाई सुनबाई” ही मालिका देखील आता लवकरच एक्झिट घेण्याच्या तयारीत आहे.

झी वाहिनीने अग्गबाई सासूबाई या मालिकेचा सिक्वल काढून ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आणली. छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले होते. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, बबड्या, शुभ्रा, अनुराग या सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

या मालिकेत एक नवखा चेहरा शुभ्राच्या भूमिकेत पाहायला मिळाला. या शुभ्राची भूमिका साकारली ती अभिनेत्री “उमा ऋषिकेश” हिने. उमा ऋषीकेशने आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात…

अग्गबाई सुनबाई या मालिकेअगोदर ‘स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतून उमाने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. एसएनडीटी महाविद्यालयातून उमाने एमएची पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय कथ्थक आणि नाट्य संगीताचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. उमाने ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरविले आहेत.

अद्वैत दादरकारचे आई-वडील शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिने नाट्य संगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे पहिले-वहिले नाटक मिळाले.

उमा ऋषिकेश हिचे पूर्ण नाव आहे “उमा ऋषिकेश पेंढारकर” प्रसिद्ध गायक, नाट्य दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर हे तिचे सासरे तर प्रसिद्ध नाट्य कलाकार, गायक भालचंद्र पेंढारकर यांची ती नातसून होय. उमाचा नवरा ऋषिकेश पेंढारकर हे आर्किटेक्ट आहेत. अभिनयापासून तो दूरच आहे पण सेटवर अनेकदा हजेरी लावताना पाहायला मिळतो.

उमा आणि ऋषिकेश यांचे फोटो सोशल मीडियावर तुम्हाला क्वचितच पाहायला मिळतील मात्र हे दोघेही एकमेकांना अनुरूप आहेत हे त्यांचे फोटो पाहून समजेल. प्रशांत दामले यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकात उमाने रेवतीची भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच संगीताचीही आवड असलेल्या उमासाठी हे नाटक खूपच खास ठरले होते. या भूमिकेसाठी तिला राज्यपुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.