आपण नेमकं कशावर विश्वास ठेवायचा ? नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्यात काहीतरी खटकलं आहे. अशी चर्चा सध्या सुरू आहे. पण यात किती सत्य आहे, हे मात्र अजूनही कुणाला माहीत नाही. चला तर मग जाणून घेऊयात. व्हायरल सत्य
सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो इंडियन आयडलचे १२ वे पर्व सुरु झाले आहे. नुकताच सोनी वाहिनीने इंडियन आयडलच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण हा परिक्षक नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमियासोबत मजामस्ती करताना दिसतो.
दरम्यान आदित्य नेहाला, ‘तिला माझं सुख बघवत नाही’ असे बोलताना दिसत आहे. पण तो कितपत खरं आणि खोटं बोलत आहे ? हे कळत नाही. म्हणजे सोशल मीडियावर भलतंच अर्थ घेतला जातोय. नाही असं काही नाहीये.
सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य नेहाशी बोलत असतो.
‘जिला मी माझ्या लग्नात बोलावले होते पण तिला माझं सुख बघवत नाही. जळकी परिक्षक नेहा कक्कर’ असे आदित्य बोलतो. आदित्यचे बोलणे ऐकून नेहा, विशाल आणि हिमेशला हसू अनावर झाले आहे.
आदित्यच बोलणे ऐकून नेहादेखील आदित्यला ‘हा. तू माझ्या लग्नात कुठे होतास? आला नाहीस. तू आलास का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर आदित्यने शाहरुख खानच्या स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे.
‘जसं की शाहरुखने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटात म्हटले होते.. मैं नहीं आऊंगा’ असे आदित्य मजेशीर अंदाजात बोलताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
दोघांचं ही नुकतंच लग्न झालेले आहे. दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी असताना असं मजेदार घडलेलं काही चुकीच्या अर्थाने वेगळं व्हायरल होतं.
पुढील वाटचाली साठी दोघांनाही खूप शुभेच्छा.