एकेकाळी आपल्या चित्रपटांद्वारे बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता सुनील शेट्टी आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सुनील वीरप्पा शेट्टी यांचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकच्या मालकी येथे झाला. सुनीलने बरेच हिंदी चित्रपट करून आपल्या कारकीर्दीत मोठे नाव कमावले आहे; पण सुनील गेल्या कित्येक दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे.

त्याने चित्रपट करणे सोडलं आहे. सुनीलने 1992 मध्ये ‘बलवान’ चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती सुनीलसोबत दिसली होती. सुनीलने त्याच्या पहिल्याच चित्रपटात एक उत्तम धुमधडाक्यात सीन केला होता. जरी त्याचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कामगिरी करू शकला नाही.

तरी सुनीलने अल्पावधीतच इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले होते. सुनीलने इंडस्ट्रीत येताच अक्षय, शाहरुख आणि सलमान सारख्या कलाकारांना स्पर्धा दिली होती. सुनीलला त्याची खरी ओळख त्याच्या ‘दिलवाले’ चित्रपटातून मिळाली.

विशेष म्हणजे सुनीलला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही देण्यात आला होता. सुनीलने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये सुमारे 110 चित्रपट केले आहेत.

‘धडक’ चित्रपटाच्या नंतर सुनीलचे आयुष्य बदलले आहे. हा सिनेमा हिट झाल्यापासून सुनीलनेही फी वाढविली होती आणि तो प्रत्येक चित्रपटासाठी 8 कोटी रुपये घेत असे. सुनील शेट्टी च्या अभिनयाचे लाखो चाहते झाले होते. जे आजही आहेत. ते त्याला लवरकच पडद्यावर पुन्हा दिसावं या प्रतिक्षेत आहेत. सुनील शेट्टी तामिळ जरी असला तरी त्याने एखादी फिल्म सोडता बाकीच्या सगळ्या हिंदीत केलेल्या आहेत.

फिल्म इंडस्ट्रीत यश मिळवून सुनीलनेही हॉटेल इंडस्ट्रीत सुद्धा मोठे नाव कमावलेलं आहे. आजकाल सुनील चित्रपटांपासून थोडा दूर आहे आणि तो आपला बहुतेक वेळ हॉटेलची देखभाल करण्यात घालवितो. त्याला हॉटेल व्यवसायात सध्या आनंद मिळत आहे. त्यामुळे त्याने मुलीला इंडस्ट्री त एंट्री देऊन त्याने मात्र लांब राहून व्यवसाय करायचा पवित्रा घेतला आहे.

त्याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना, तुम्हाला सांगावं वाटतं की सहसा अभिनेते अभिनेत्री फक्त इंडस्ट्रीत आल्यानंतरच प्रेमात पडतात आणि मग ते लग्न करतात पण सुनीलच्या बाबतीत उलटं. करत होता.

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सुनीलचं 8 वर्षांपासून माना शेट्टीशी डेट करत होता आणि 1991 मध्ये त्यांचे लग्न झाले. कारण ते एकमेकांना खूप जपत होते. समजून घेत होते आणि प्रेम करत होते. सध्या प्रेम करणारी माणसे सोबत असणं खूप गरजेचं होऊन बसलं आहे.

सुनीलची पत्नी एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे.आणि त्याच बरोबर ती चालवत असलेली एक आर्किटेक्चर कंपनी देखील आहे. ती एक एनजीओ देखील चालवते आणि इतकेच नाही तर ती तिचा पती सुनीलची बिझिनेस मॅनेजर देखील आहे. सुनीलच्या हॉटेलशिवाय त्याच्याकडे स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस आणि बुटीक देखील आहे जे ते आणि त्यांची पत्नी एकत्र व्यवस्थापित करतात. चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही सुनील दरवर्षी 100 कोटी रुपये मिळवतो आणि भव्य आयुष्य जगतो.

सुनील शेट्टी जरी आज चित्रपट मध्ये नसला दिसत तरी त्याने निर्माण तकरून ठेवलेलं काम त्याची कसर भरून काढतं. आज तो कुटुंबातील लोकांसोबत खूप वेल सेटल आहे. त्याला आथिया शेट्टी ही मुलगी आहे जी सध्या बॉलिवूड मध्ये नशीब आजमावून पाहत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.