मित्रांनो बॉलीवूड इंडस्ट्री असो किंवा टॉलीवूड इंडस्ट्री, तुम्हाला अशा अनेक अभिनेत्री सापडतील ज्यांनी कोणासाठी तरी वाट पाहण्यात आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं आहे.

प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे एक उदाहरण तरी तुम्हाला नक्कीच सापडेल. आज आम्ही तुमच्यासाठी देखील असेच एक नवीन उदाहरण घेऊन आलो आहोत. या अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रभुदेवा यांच्यासोबत आपलं नातं संपुष्टात आल्याचं घोषित केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊयात….

चित्रपट सृष्टीत अनेक जोड्या एकत्र येतात आणि काही कालांतराने वेगळ्या देखील होतात. परंतु त्यांच्यातील प्रेम मात्र कमी होत नाही आणि कोणीतरी शेवटपर्यंत दुसऱ्या व्यक्तीचे वाट बघत आयुष्य व्यतीत करतं. असंच काहीसं घडलं नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या बाबतीत.

नयनतारा सुरुवातीपासूनच प्रभुदेवा वर जीवापाड प्रेम करते, नयनताराने स्वतःच्या करिअरची सुरुवात अत्यंत शांत पद्धतीने केली. परंतु त्यानंतर लोकांना नंयनताराचे काम प्रचंड आवडले आणि ते साउथ फिल्म इंडस्ट्री एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पुढे आली.

नयनताराने फिल्म इंडस्ट्री ला अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. नयनताराला प्रभुदेवा बद्दल प्रचंड आकर्षण होतं आणि त्यामुळेच ती प्रभू देवाला जिवापाड प्रेम करत असे. नयनतारा एका ख्रिश्चन घरातून आलेली अभिनेत्री आहे त्यामुळेच प्रभुदेवाच्या कुटुंबाने तिला स्वीकारले नाही असे सांगितले जाते.

नयनताराने प्रभुदेवासाठी धर्मांतर देखील करण्याची तयारी दाखवली, परंतु प्रभुदेवाच्या परिवाराने तरीही तिला स्वीकारले नाही आणि त्यामुळेच दुर्दैवाने प्रभुदेवा आणि नयनतारा एक मेकांपासून वेगळे झाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.