खरतरं गेल्या काही दिवसांपासून एक नाव सोशल मीडियावर चांगलच चर्चेचा विषय बनून राहिल्याच पहायला मिळतं आहे. अनेकांना या नावाच्या व्यक्तीचा ठावही घ्यायचा आहे, तिच्याबद्दल जाणून घ्यायची अनेकांना आवड निर्माण झाली आहे, अनेकांना तिच्याबद्दल थोडसं का असेना पण एक कुतूहल निर्माण झालेलं सोशल मीडियावर पहायला मिळतं आहे.
चला तर मग आपण आता पाहुयात हे व्यक्तीमत्व नेमकं कोण आहे, आणि कोणत्या कारणाने तिची इतकी चर्चा रंगलीये. तर मुळात ही व्यक्ती इतर कोणी नसून ती प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिची भाच्ची आहे. आणि अर्थातचं ट्विंकल खन्नाची भाच्ची ही भल्याभल्या अभिनेत्या व अभिनेत्रींच्या मुलामुलींपेक्षा कैक पटींनी सुंदर, सालस आणि भलतीच गोंडस अर्थात क्युट दिसते.
तिच्या याच क्युटनेसपणामुळे ती आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेली पहायला मिळते आहे. आणि तिच्याबद्दल अनेकांना आता अगदी सारकाही जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली आहे. तर नाओमिका सारन हे तिचं नाव. आणि ती सुपरस्टार अभिनेते राजेश खन्ना यांची नात आहे. ट्विंकल खन्ना हीची छोटी बहिण असलेल्या रिंकी खन्नाची ती मुलगी आहे.
2018 सालात रिंकीची ही मुलगी अर्थात नाओमिका भारतात आली होती आणि त्याचदरम्यान तिची काही ठराविक छायाचित्रे टिपण्यात आली होती, जी आत्तादेखील सोशल मीडियावर व्हायरलं होताना पहायला मिळतं आहेत. नाओमिका ही खरतरं परदेशात वास्तव्य करते. लंडन हे ठिकाण तिचं रहाण्याच ठिकाण आहे. नाओमिका सध्या केवळ १६ वर्षांची असून ती तिच्या शिक्षणात फार व्यस्त असल्याची पहायला मिळते, एवढचं काय तर ती सोशल मीडियावरही कधी सक्रीय असल्याची दिसत नाही.
नाओमिकाची आई अर्थात रिंकी खन्ना हिने थोडाकाळ हिंदी सिनेसृष्टीत घालवला परंतु हवं तसं यश तिला संपादन करता नाही आलं, आणि नंतर पुढे लग्न झाल्यानंतर ती घरगृहस्थी संसारातच मग्न झाल्याने तिने हिंदी सिनेसृष्टीला कायमचाच रामराम ठोकला. रिंकी खन्ना आणि तिचं कुटुंब लाईमलाईटच्या झगमगाटापासून बरचसं दूर राहत असल्याचं आजही पहायला मिळतं. २००३ साली एका बिझनेसमॅन सोबत लग्न केल्यानंतर लंडनमधेच रिंकी कायमची स्थायिक झाली.
लग्नाच्या वर्षभरातचं अर्थात २००४ या सालात तिने तिच्या पहिल्या बाळाला म्हणजेच नाओमिकाला जन्म दिला. नाओमिका हिंदी सिनेसृष्टीत कदाचित पदार्पण करू शकते अशा बातम्या याआधी एकदोनदा रंगल्याच्या पहायला मिळाल्या आहेत. इतकचं काय तर नाओमिका एक उत्कृष्ट कथक नृत्याकलेची नृत्यांगणादेखील आहे, याबाबत तर चक्क ट्विंकल खन्ना हिनेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नाओमिकाचे फोटो टाकत तिचं कौतुक केल्याच पहायला मिळालं होतं.
नाओमिकाचा कझन भाऊ असलेला आरव, याच्यासोबतही नाओमिका बरचं चांगल नातं टिकवून असल्याची पहायला मिळते. ती तिच्या भावाच्या अगदी जवळची आणि लाडकी बहिण आहे. नाओमिका आपल्या भावासोबच कायमच तिचा चांगला वेळ घालवत असते.
नाओमिका वैयक्तिकरित्या सोशल मीडियापासून फारच दुर आहे, तिचं इन्स्टाग्रामवरील अकाउंटदेखील प्रायव्हेट असल्याच पहायला मिळतं. नाओमिकाला तिच्या गोष्टी शेअर करायला फारसं आवडत नाही, तिचा फोकस सध्यातरी शिक्षण पूर्ण करण्यावरच असल्याच दिसतं आहे. मुळात या गोड आणि गोंडस चेहऱ्याची देण लाभलेल्या मुलीने भविष्यात सिनेसृष्टीत काम करावी अशी अनेकांची मनस्वी ईच्छा असल्याची पहायला मिळते आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!