riteish million Thank God Bappa

रितेश देशमुखचा  थँक गॉड बाप्पा  म्युझिक व्हिडीओ व्हायरल



 

मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह निर्मित म्युझिक व्हिडिओ
सहा दिवसात लाखो व्ह्यूज,लाईक्स आणि शेअर

गणेशोत्सवाच्या बदलत्या रूपावर भाष्य करणारा मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह
निर्मित रितेश देशमुखचा थँक गॉड बाप्पा हा म्युझिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी हे गाणं सोशल

मिडीयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले. गेल्या सहा दिवसात युट्युब, ट्विटर, व्हॉट्सअप आणि हॉटस्टारच्या
माध्यमातून लाखो लोकांनी हा व्हिडियो पाहिला आणि शेअर केला असून सर्वत्र या गाण्याची चर्चा आहे.

 Thank GodBappa हा हॅशटॅग यामुळे चांगलाच ट्रेंड होतो आहे

रॅप ढंगातल्या या गाण्यावर अभिनेता रितेश देशमुख थिरकला असून त्यानेच हे गाणं गायलं आहे. रितेशची पत्नी आणि
अभिनेत्री जेनेलिया देशमुखनं मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून स्टार प्रवाहच्या सहकार्यानं या म्युझिक व्हिडिओची

निर्मिती केली आहे.
थँक गॉड बाप्पा& हे गाणं गणेशोत्सवातल्या इतर गाण्यांपेक्षा फारच वेगळं आहे. एक निराळा विचार हे गाणे मांडते.
मनोरंजन वाहिनी म्हणून काम करताना स्टार प्रवाह ने कायमच सामाजिक भान जपलं आहे. मालिका आणि

मनोरंजनाचे कार्यक्रम करताना समाजाला दिशा देणं हे स्टार प्रवाह आपलं कर्तव्य मानते. त्याच विचारातून हे गाणं

करण्यात आलं आहे.

जाहिरात क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कपिल सावंत यांनी हे गाणं लिहिलं आहे. तसंच म्युझिक व्हिडिओचं

दिग्दर्शनही केलं आहे. जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार अमर मंगरूळकर यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे.

मनोज लोबोयांनी छायाचित्रण, अदेले परेरिया यांनी संकलन, मंदार नागावकर यांनी कला दिग्दर्शन, पुनीत जैन व अम्रिता
सरकार यांनी वेशभूषा, नितीन इंदुलकर यांनी रंगभूषा केली आहे तर शिवकुमार पार्थसारथी यांनी इंग्लिश सबटायटल्सचे
काम पाहिले आहे.

हा म्युझिक व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे हे गाणे करताना त्यामागे असलेला वेगळा विचार सफल झाल्याची भावना
‘टीम थँक गॉड बाप्पा’ ची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here