मित्रांनो!, नुकताच २९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संपत्तीविषयी… संजय दत्तने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत 123 चित्रपट केले आहेत, त्यापैकी 5 चित्रपट सुपरहिट, 26 फ्लॉप आणि 2 ब्लॉकबस्टर आहेत. बॉलीवुडचा मुन्नाभाई अभिनेता संजय दत्त 10 सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे.
संजय दत्त अनेक प्रकाराने कमाई करतो. एका सिनेमासाठी 6 ते 8 कोटी इतके मानधन घेतो. आजही त्याची फॅनफॉलोइंग कमी झालेली नाही. त्यामुळे बरेच निर्माता आणि दिग्दर्शक त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक असतात. सिनेमाव्यतिरिक्त एण्डोर्समेंट म्हणून ब्रँड्ससाठी एक कोटी रुपये फी घेतो. त्याच्याकडे स्वतःची मोठी गुंतवणूकही आहे.
त्याने 50 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर संजय दत्त दरवर्षी सुमारे दीड ते दोन कोटीही कर भरतो. संजय दत्तने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत 123 चित्रपट केले आहेत, त्यापैकी 5 चित्रपट सुपरहिट, 26 फ्लॉप आणि 2 ब्लॉकबस्टर आहेत. संजू बाबाच्या आयुष्यावरील बायोपिकही सुपरहिट ठरला.
या ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसरही चांगलीच कमाई केली संजू बाबाची भूमिका सिनमात अभिनेता रणबीर कपूरने साकारली होती. सुरुवातीपासूनच लक्झरी कारची आवड आहे. संजय दत्तकडे जवळपास 10 महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.
फरारी 599, रोल्स रॉईस गोस्ट, ऑडी, बेंटले, लैंड क्रूजर, मर्ससीडीज, पोरशे, हरले आणि डुकाटी सारख्या गाड्याचा समावेस असून या गाड्यांची किंमत 13 कोटींहूनही अधिक आहे. संजय दत्त आज कोट्यावधीचा मालक आहे. संजय दत्तकडे 21.2 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 160 करोडची संपत्ती आहे. त्यामुळे या वयातही संपत्तीच्या बाबतीत इतर बॉलीवुड कलाकारांना टक्कर देतो.
संजय दत्तचे वांद्रे, पाली हिल जवळ एक आलिशान घर आहे आणि ते देखील त्याच्या मालकीचे आहेत. 2009 मध्ये त्याने हा आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. ज्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे. याच घराचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत संजय दत्त आपला कुटुंबासह निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. संजूबाबाच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल.
घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी संजय दत्त आणि मान्यता दत्तने बरीच मेहनत घेतली आहे. घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी दोघांनी बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.