मित्रांनो!, तुम्हाला हे माहिती आहे का, की शोले चित्रपटात सुरुवातीला नव्हतेच सांबा हे पात्र? कोणत्या कारणामुळे लिहिण्यात आले हे पात्र? जावेद अख्तर यांनी कार्यक्रमात सांगितले की, ‘गब्बरसाठी जेव्हा आम्ही संवाद लिहित होते. तेव्हा आम्हाला त्यात आणखी एका पात्राची आवश्यकता वाटत होती. कारण गब्बरला पोलिसांनी त्याच्यावर काय बक्षिस ठेवले आहे, हे त्यानेच सांगणे मला बालिशपणाचे वाटत होते.

त्यामुळे त्याची माहिती हे पात्र देईल असे मला वाटत होते. जेव्हा पटकथा लिहिण्यात आली, त्यावेळी सांबा नावाचे पात्र त्यात नव्हतं. पुढे हे पात्र लिहिण्यात आले आणि अरे ओ सांभा, सरकार कितना इनाम रखे हैं हमपर… हा संवाद लिहिण्यात आला.अभिनेते मॅक मोहन यांनी 1986 साली मिनी मक्किनीशी लग्न केले. लग्नानंतर, मॅक मोहन आणि मिनी मक्किनी यांना तीन मुले झाली मंजिरी मक्किनी, विनती मक्किनी आणि मुलगा विक्रांत मक्किनी.

त्यांचे कुटुंबिय मुंबईत राहातं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मंजिरी आणि विनती दोघीही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाल्या आहेत. मंजरी आणि विनती या दोघींनी मिळून देशातील पहिला स्केटबोर्डिंगवर आधारित चित्रपट बनण्याचा निर्णय घेतला आहे. मंजिरी ही लेखिका, दिग्दर्शिक असून तिच्या शॉर्ट फिल्मना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मंजिरीने क्रिस्टोफर नोलन आणि पेंटी जेंकिंस या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

यांच्यासोबत तिने डंकर्क, द डार्क नाइट राइजेस आणि वंडर वूमेन आदी चित्रपटांसाठी काम केले. याशिवाय टॉम क्रूजच्या मिशन इम्पॉसिबल गोस्ट प्रोटोकॉल, वेक अप सिड आणि विशाल भारद्वाज यांच्या सात खून माफ या चित्रपटातही तिचे योगदान आहे. तीन शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्यानंतर एक दिग्दर्शिका म्हणून नावारूपास आलेली मंजिरी आता आपल्या बहीणीसोबत म्हणजेच विनतीसोबत बॉलिवूडमध्ये तिचा पहिला चित्रपट दिग्दशिृत करणार आहे.

विनती हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. ‘डेजर्ट डॉलफिन’ नामक या चित्रपटात राजस्थानच्या एका गावात राहणाऱ्या प्रेरणा नामक मुलीची कथा रेखाटण्यात येणार आहे. ही मुलगी ३४ वर्षांची ग्राफिक आर्टिस्ट जेसिकाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून स्केटबोर्डिंग करण्याचे स्वप्न पाहते. तूर्तास या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे.

मॅक मोहनच्या मुलाबद्दल बोलायचे झाल्यास, तो मुळात सर्वसामान्यांपेक्षा दिसायला जरा वेगळा आहे.त्याच्या मुलाचे नाव विक्रांत आहे आणि तो अभिनेता देखील आहे. त्यांनी मंजरीच्या ‘द लास्ट मार्बल’ या चित्रपटातही काम केले आहे. आणि सर्वात शेवटी एक फारच कमी लोकांना माहिती असलेली एक गोष्ट म्हणजे मॅक मोहन बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचे मामा होते.