बॉलिवूडमध्ये, छोटा पडद्यावर बऱ्याच दिवसांपासून लॉकडाऊन असतानाही सतत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरी लग्नसोहळा होत आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने रोहनप्रीत या सिंगरसोबत लग्न केलं तर त्याचबरोबर सिंघम या चित्रपटात अभिनेता अजय देवगनसोबत दिसणारी अभिनेत्री काजल अग्रवालही काही दिवसांत लग्न करणार आहे. काजलच्या घरात लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे.
अश्यात टिव्ही मालिका मध्ये स्वतःची वेगळी ओळख करणाऱ्या एका अभिनेत्री बद्दल आम्ही आपल्याला गुपित माहिती सांगणार आहोत. कारण तिच्या लग्नाबद्दलची माहिती आहे. तिचा साखरपुडा झालाय ? अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या अभिनेत्री मौनी रॉयची चाहत्यांमध्ये कायमच चर्चा असते. मौनी अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
अलिकडेच मौनीने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात अंगठी दिसत असून मौनीने साखरपुडा केला की काय असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मौनीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात डायमंड रिंग दिसत आहे. त्यामुळे मौनीने गुपचूप साखरपुडा केला अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
पण असं असलं तरी काही गोष्टी या माहितीच्या खऱ्या बेसवर आधारित नसतात. तसच मौनी रॉय बद्दलच्या शक्यता या खोट्या ठरलेल्या आहेत. तिने हातात रिंग साखरपुडा झाल्याने नाहीतर एका ब्रँड च्या जाहिरात करण्यासाठी घातली होती.
त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेणे, हे जरा चुकीचं धोरण आहे. कारण मौनी रॉय लग्न करत नाहीये.