Apurva Nemlekar Real Life

रात्रीस खेळ चाले, या लोकप्रिय झालेल्या मालिकेतून नावारूपास आलेली अभिनेत्री म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. तिची रात्रीस खेळ चाले ही मालिका आता बंद झालेली आहे. पण रसिकांना, चाहत्यांना तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहायचं आहे.

आणि तिनेही चाहत्यांना एक खुशखबर दिलेली आहे. ती लवकरच पम्मीच्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणात आहे. तुझं माझं जमतंय. या नव्या मालिकेत.

नव्या ढंगात, नव्या भूमिकेत ४ नोव्हेंबर पासून सुरू होत असलेल्या झी युवा या वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ या नव्या मालिकेत ती पम्मीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी तिने दिलेली आहे, की लवकरचं पडद्यावर काम करणार आहे; पण शेवंता म्हणून नाहीतर पम्मी म्हणून.

तीने साकारलेली पम्मी शेवंताच्या भूमिकेइतकीच हटके असल्याचे मालिकेच्या प्रोमोवरून पाहायला मिळतय. झी मराठीच्याच ‘आभास हा’ या मालिकेतून अपूर्वाने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. तेव्हा सुरू झालेला अपूर्वाचा प्रवास दिसतो तेवढा ही सोपा नाही. तिने छोटी मोठी कामे, संघर्ष करून इथपर्यंत मजल मारली आहे.

‘भाखरवाडी ७ किमी’, ‘इश्कवाला लव्ह’ सारख्या चित्रपटांमधून तीने काम केले आहे. ती कॉलेजमध्ये शिकत असतानाच अपूर्वाला ‘आभास हा’ या मालिकेसाठी निवडले होते. तिच्या साठी सुवर्णसंधी स्वतःहून चालून आली होती. योग्य ती संधी मिळाल्याने अपूर्वाने या मालिकेसाठी आपला होकार कळवला.

अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर तिने इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून कामही केले होते परंतु मालिकेत काम करण्यासाठी चालून आलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत यातच आपले करिअर करण्याचे ठरवले. अभिनया सोबतच अपूर्वा स्वतःचा व्यवसाय देखील उत्कृष्टरीत्या सांभाळत आहे. तिने अभिनय क्षेत्रात येण्याआधी इव्हेंट मॅनेजर म्हणूनही बरेच काम केलेलं आहे.

एवढंच नव्हे तर, इमिटेशन ज्वेलरी डिझाईनचा तिचा हा व्यवसाय अगदी जोमाने सुरू असून तिच्या या ज्वेलरीला अनेकांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सोशल मीडियावर तिच्या ह्या ज्वेलरीचे कलेक्शन नेहमीच पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर ही सतत कार्यरत असते. चांगल्या वाईट प्रकारे ट्रोल करणाऱ्या लोकांना ती प्रत्युत्तर देत असते.

एका दगडात दोन पक्षी म्हणजेच अभिनय आणि व्यवसाय अशा दुहेरी बाजू सावरणाऱ्या अनेक मोठमोठ्या मराठी कलाकारांना तुम्ही पाहिले असेल. तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, निवेदिता सराफ, क्रांती रेडकर अशा यादीत अपूर्वाचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल.

सर्व काही सांभाळून ती तिचं आयुष्य ही खूप उत्तम रित्या जगत आहे. अपूर्वा ला तिच्या भावी वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा !…