ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

पुणे – आगामी हिंदी चित्रपट पुणे टू गोवा चा मुहूर्त काल ( १ जानेवारी २०२२ ) स्वामी उमेशानंद ह्यांच्या हस्ते धनकवडी , पुणे येथे संपन्न झाला. ह्या प्रसंगी चित्रपट अभिनेते – निर्माते अदित्यराजे मराठे , सह निर्माते योगेश गुजर , महायोद्धा प्रतिष्ठान संस्थापक – अध्यक्ष धनंजय भोसले , सिने अभिनेते प्रशांत तपस्वी , युवा दिग्दर्शक अमोल भगत , सह दिग्दर्शक कृणाल नंदकिशोर मेथा , वेंकटेश कदम , हृतिक वळगे , कॅमेरामन साई माने , मेक अप आर्टिस्ट फलक , साऊंड डिझायनर विकास खंदारे , प्रोडक्शन हेड प्रमोद कोंडे , प्रोडक्शन मॅनेजर अतुल , लाईट मन रॉकी , कॉस्च्युम डिझायनर साक्षी करवा तसेच चित्रपटातील सह कलाकार , गौरव भोसले , विशाल आचार्य , करण रजगे , राकेश महाजन , शंकर मोहिते , महेंद्र खिल्लारे , विजय कोल्हे , रवी साळुंके , साधना हाके , सोनू टक्के , अमित रोडे , संदेश जाधव , हेमंत राऊत , निखिल जाधव , स्नेह पवार , विभावरी क्षीरसागर , जय केंद्र , जितेंद्र ठक्कर आदी कलाकार तसेच पत्रकार कृष्णा देशमुख उपस्थित होते.

पुणे टू गोवा ह्या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कॉमेडियन सुनिल पाल आणि एहसान कुरेशी ह्यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकत्र पाहण्यास मिळणार आहे.तसेच काही हिंदी दिग्गज कलाकार देखील ह्या चित्रपटात झळकणार आहेत.