Mirchi Music Awards Marathi 2017 Ajay Atul

670

Mirchi Music Awards Marathi 2017 Ajay Atul

It’s the year of Sairat at Mirchi Music Awards Marathi Jiommamarathi.
Ajay and Atul bagged all these awards for –
1) Album of the year :  Sairat
2) Song of the year  : Yad Lagla
3) Male Vocalist :  Yad Lagla
4) Music Composer :  Sairat Zhala ji
5) Programmer and Arranger of the year  :  Sairat Zhala ji
6) Listener’s choice song of the year : Sairat Zhala ji
Congratulations to all the winners!! We’ll be posting more BTS and red carpet moments on our Instagram and Twitter! Make sure you check it out!
Mirchi sunne wale, always khush!

मिर्ची म्युझिक अवार्डच्या शानदार सोहळ्यात ‘सैराट’ चाच आवाज

Mirchi Music Awards MarathiAjay Atul

नुकताच मिर्चि म्युझिक अवार्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात २०१६ मध्ये गाजलेल्या मराठी सिने जगतातील संगीतकार, गायक, गीतकार यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याकडे अर्थातच मराठी संगीत क्षेत्रातील सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. अखेर नुकताच हा सोहळा पार पडला असून यात ‘सैराट’ सिनेमाच्या म्युझिकसाठी अजय-अतुल या संगीतकार जोडीने सर्वात जास्त अवार्ड पटकावले आहेत.
मराठी सिनेमांप्रमाणे मराठी संगीतही आता प्रेक्षकांच्या अधिक जवळ जात आहे. मराठी संगीताल आता एक नवा वेगळा साज चढला आहे. पण मराठी संगीताने आपला अस्सलपणा अजूनही जपला आहे. त्याचाच गौरव रेडीओ मिर्ची एफएमकडून दरवर्षी करण्यात येतो. यंदाही हा सोहळा पुण्यात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पड्ला. या सोहळ्याला मराठी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज संगीतकार, गायक यांच्यासोबतच मराठी कलाकारांनीही हजेरी लावली.
यावर्षी या सोहळ्यात कोणत्या सिनेमाला जास्त अवार्ड मिळणार हे कुणीही डोळेझाक करून सांगू शकत होतं. ‘सैराट’ या सिनेमाने वर्षभर आपल्या धमाकेदार आणि रोमॅंटिक गाण्यांनी वेड लावलं होतं. अपेक्षेप्रमाणे या सिनेमालाच सर्वात जास्त पुरस्कार मिळाले. ‘सैराट’ सिनेमाला ‘अल्बम ऑफ द इअर’, ‘याड लागलं’ या गाण्याला सॉंग ऑफ द इअर’ चा पुरस्कार मिळाला. त्यासोबतही अनेक पुरस्कार अजय-अतुल यांनी पटकावले.

 

Mirchi Music Awards 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here