बालगंधर्व,अजिंठा,संदूक आणि वजनदार ह्यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या संगीतासाठी गोड आवाज देणारी मराठमोळी गायिका मधुरा कुंभार हिने नुकताच तिचा पहिला Solo Live Concert गडकरी रंगायतन ठाणे येथे सादर केला.
              सर्वांच्याच प्रेरणास्थान असलेल्या आशाताई भोसले आणि लता मंगेशकर ह्यांना ट्रिब्युट देत मधुराने त्यांची गाजलेली प्रत्येक गाणी गात प्रेक्षकांना खुश केले. ह्या कार्यक्रमाचे स्वरूप खूप सुंदर पद्धतीने आखण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाच्या संगीत संयोजनाची धुरा सुप्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीत दिग्दर्शक कमलेश भडकामकर यांनी सांभाळली. मधुरा कुंभार LIVE ह्या कार्यक्रमाचा पहिला भाग लताताई आणि आशाताई ह्यांच्या मराठी गाण्यांवर आधारित होता. तसेच ह्या भागासाठीच सूत्रसंचालनदेखील मराठी मध्येच करण्यात आले होते. तसेच ह्या कार्यक्रमातील दुसरा भाग हा हिंदी गाण्यांवर आधारित होता आणि त्याचे सूत्रसंचालन हिंदी मध्ये करण्यात आले. आर.जे. प्रणिता ने ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिच्या अनोख्या भाषाशैलीत करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
               तसेच ह्या कार्यक्रमाची सांगता रहेना रहे हम मेहका करेंगे ह्या सुंदर गाण्याने करण्यात आला. एखादा कार्यक्रम जेव्हा इतका यशस्वी होतो तेव्हा त्यामागे पाठबळ देणारे अनेक लोकं असतात. ह्या संपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती सुमुख वर्तक ह्यांनी केली होती.
             Zee SaReGaMaPa Singing Superstar 2010 मध्ये नावारूपाला आलेली गायिका मधुरा कुंभारने स्पर्धक असताना गायलेली आशाताई भोसले आणि लता मंगेशकर ह्यांची गाणी आता ती Live प्रेक्षकांसमोर गातेय आणि त्याला प्रेक्षकांच्या इतका चांगला प्रतिसाद मिळतोय यासाठी ती स्वतःला खूप भाग्यशाली समजते.
मधुरा कुंभार LIVE हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर करण्याचे आयोजित केले आहे तसेच मधुरा आता पुढे कोणत्या शहरात येते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल.