Upcoming Marathi Movie Happy Birthday Teaser

ही कथा आहे जयची… एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका पंधरा वर्षाच्या मुलाची. घरात मोठी बहिण, आई बाबा, असं त्याचं कुटुंब. मित्राशी सतत बेट लावणं आणि जिंकणं हेच त्याला माहित होतं. जेवढा तो मस्तीखोर होता, तेवढाच तो सर्वांचा लाडका. घरी सर्व लाड पुरवले जात होते आणि शाळेतही. त्याला सर्वांच्या सहानभुतीचं वागणं, खूप आश्चर्यचकित करणारे वाटत असे.. कारणही तसच होतं. जयला लहानपणापासूनच थलासिमिया सारखा दुर्दम्य आजार होता. त्या आजारावर कोणताही इलाज नव्हता. त्याचा आयुष्य जगण्याचा एकच मार्ग होता, प्रत्येक पंधरा दिवसांनी जयला रक्त घ्यावे लागत होते. रक्त देऊनही तो किती जगू शकेल, हे त्याला किंवा डॉक्टरांनादेखील माहित नव्हते. कारण अशा रोगाची लक्षणं असलेल्या पेशंटची जीवनमर्यादा असते ते सोळा वर्ष आणि जयला पंधरावे वर्ष सुरु होते… बघता बघता जयला सोळावं वर्ष लागलं. जयचा सोळावा Happy Birthday…!! आता पुढे काय….??? जयचा Birthday साजरा होतो का ? जर होतो तर कशाप्रकारे ? जय उरलेलं आयुष्य कशाप्रकारे जगतो ? तो आपल्या मृत्यूवर जय मिळवतो का ? या कथेद्वारे थलासिमिया सारख्या दुर्दम्य रोगाची लागण झालेल्या पेशंटची मनोबल वाढवून जगण्याची नवीन उमेद देण्याचा मानस आहे. वर्ष म्हणजे जन्म आणि मृत्यू म्हणजे शेवट.. या दोन शब्दामधला स्वच्छंद प्रवास म्हणजे जीवन. वर्ष म्हणजे जन्म आणि मृत्यू म्हणजे शेवट यातला प्रवास .. या प्रवासात कुणाचा सहवास किती असेल ते कुणालाच कळत नाही.