मराठी सिनेसृष्टीत आजवर आपल्या अभिनयाने फार दर्जेदार छाप पाडणारी अभिनेत्री अर्थात रूचिता जाधव हिने नुकताच तिचा विवाहसोहळा उरकून घेतला आहे, तोदेखील अगदीच गुपचुपरित्या उरकून घेतल्याची गोष्ट प्रखर्शाने पहायला मिळाली आहे. रुचिताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने साखरपुड्याचे फोटोज शेअर केल्यानंतर तिच्या लग्नाची चाहूल तर आधीच सर्वांना लागली होती.
परंतु ती नेमकं कधी लग्न करते याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं, पण तिने मात्र कोणाला फारसा पत्ता न लागू देता पाचगणी या ठिकाणी आपला विवाह उरकून घेतला असचं म्हणावं लागेल. रूचिताच्या अनेक जवळच्या मित्रमैत्रिणींनी ज्यावेळी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटोज वगैरे शेअर करायला सुरूवात केली तेव्हा लोकांना आणि तिच्या चाहत्यांना तिचं लग्न झाल्याचं माहित पडलं.
आणि त्यानंतर स्वत: रूचितानेही तिच्या लग्नाचे काही फोटोज तिच्या स्टोरीला ठेवत ते शेअर केल्याचे पहायला मिळाले. “लव्ह लग्न लोचा” या मालिकेने तिला खास वेगळी अशी ओळख मिळवून दिली, तिने आजवर मराठी सिनेसृष्टीत बरीचशी कामे केलेली पहायला मिळतात. परंतु रूचिता लव्ह लग्न लोचा मधील भुमिकेमुळे तमाम महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. आणि याच रूचिताने आता बिझनेसमॅन असलेल्या आनंद माने या व्यक्तीसोबत लग्न केल्याचं पहायला मिळतं आहे.
पाचगणी येथील एका व्हिलामधे दोघांचा विवाहसोहळा अगदी शांतरित्या व्यवस्थितपणे पार पडला आहे. अभिनेत्री रूचिता जाधव हिने याआधी आम्ही पाचगणीला तीन दिवसांचा प्लॅन करून जातोयं असं सांगितलं होतं, परंतु तिच्या या प्लॅनमधे थेट लवकर लग्नाचं सरप्राईज असेल हे तिच्या चाहत्यांना वाटलं नव्हतं. अर्थात त्यांच्यासाठी तरी हा सुखद धक्काच होता.
अभिनेत्री रूचिता जाधव ही साधारण 2013 या सालात बिझनेसमॅन असलेल्या आनंद माने या व्यक्तीसोबत प्रेमात पडली होती. रूचिता तिच्या लग्नाचा जो संगितगायनावर खर्च करणार होती, त्याऐवजी या करोनाच्या संकटात तिने पाचगणी येथील गरजूंवर त्यांची भुक भागवता यावी यासाठी ते पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला.
आणि त्यांनी ती मदत केलीदेखील. अभिनेत्री रूचिता जाधव मराठी सिनेसृष्टीत चांगल्याच काळापासून काम करत आली आहे. तिच्या आजवरच्या कामांवर लक्ष द्यायचं म्हटलं तर लव्ह लग्न लोचा, भुताचा हनीमून, माणूस एक माती, आता माझी हटली, चिंतामणी यांसारख्या विविध कामांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आलेली पहायला मिळाली आहे.
तिने आपल्या अभिनयातील हावभावांच्या जोरावर आजवर रसिकप्रेक्षकांच्या मनात स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलेलं पहायला मिळतं. अभिनेत्री रूचिता जाधव हिचा जन्म पुण्यात झाला. आणि विशेष बाब म्हणजे तिचे वडीलदेखील एक बिझनेसमॅनचं आहेत.
अभिनेता संजय नार्वेकर याच्यासोबत 2010 साली आलेल्या “अरे बाबा पुरे” या सिनेमातून तिने तिच्या सिनेसृष्टीतल्या पदार्पणाची वाट धरली. तिने काही जाहिराती देखील केल्या आहेत, तिला सिनेसृष्टीत येण्याची आवड कॉलेजच्या दिवसांमधे लागली आणि तिने इकडचा रस्ता धरला. आता तिच्या आयुष्यात नव्याने गोष्टी बहरणार आहेत, हे निश्चित. तर तिचा पती आनंद आणि ती या दोघांनाही लग्नाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!