भारतीय सिनेमाक्षेत्रात आज अनुष्का शर्मा हिने तिच्या हिमतीवर स्वत:ची ओळख कमावली आहे. आणि तिच्या या ओळखी व्यतिरिक्त तिला दुसरी प्राप्त झालेली ओळख म्हटलं तर ती भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याची पत्नी आहे. तुम्हाला कदाचित ऐकून धक्का बसेल पण अनुष्काने स्वत: अभिनयात आता तब्बल गेल्या तीन वर्षात पाऊल ठेवलं नाहीये, होय ही बाब अगदी खरी आहे.

2018 सालात आलेला झिरो हा तिचा शेवटचा सिनेमा ठरला होता. सध्याच्या घडीला ती तिच्या नवजात मुलीचा सांभाळ करत असल्याची पहायला मिळते आहे. आणि तीन वर्षांपासून ती अभिनेत्री म्हणून जरी दूर असली तरीदेखील तिची ऐकूण संपत्ती अगदी अमाप आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण तिच्याकडे बंगला, गाडी आणि बरचं काही आहे.

फोर्ब्सच्या जागतिक मॅगझिननुसार अनुष्का शर्मा हिच्याकडे तब्बल 35 मिलयन डॉलर्स अर्थात 260 कोटींच्या आसपास संपत्ती असल्याचं समजतं आहे. अनुष्काकडे तिची जी काही ही संपत्ती आहे ती सर्वाधिक तिने ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमधून कमावल्याची माहिती मिळते. याशिवाय तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु गेल्या अवघ्या तीन वर्षातच अनुष्काने बरीचशी रक्कम ही सिनेनिर्मितीतून कमावली आहे.

तिला सिनेनिर्मितीतून जवळपास आजवर 80% नफा झाल्याचीही माहिती मिळते आहे. अनुष्का शर्माला काही रक्कम तिच्या काही गुंतवणूकीतून देखील मिळत असल्याची माहिती आहे. अनुष्काचा पती असलेल्या विराट कोहलीच्या संपत्तीबाबत तर तमाम जनतेला आजवर माहिती होतीच, शिवाय अनुष्कादेखील इतका प्रचंड प्रमाणात पैसा कमावते आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अनुष्का शर्मा हिच्या एकूण संपत्तीमधे आलीशान घर, बंगला, गाडी यांचा समावेश होतो. अनुष्काने 2014 या सालात मुंबईमधे एक घर खरेदी केलं होतं. त्याची आज सरासरी किंमत 9 कोटींच्या घरात जाते असल्याचं समजतं. अनुष्काकडे इतर साधनांचीही काहीच कमी नाहीये, त्यामधे म्हटलं तर बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, यांसारख्या दर्जेदार गाड्यांचीही तिने खरेदी केलेली आहे.

अनुष्का गेल्या काही काळापासून सिनेमाकरता तब्बल 12 कोटी रूपये इतकं मानधन आकारत असल्याची माहितीही समोर आली होती. आणि त्यात विशेष म्हणजे, तिला जाहिरातींकरता अनेक प्रकारच्या ब्रॅण्ड्सकडून चांगल्या ऑफर्सदेखील येत राहतात. जाहिरातींच्या बाबतीत ती तब्बल 4 कोटी रुपयांची आकारणी करते असं काहीसं हे समीकरण आहे. आज प्रत्येकाला माहितच आहे की, रिअल इस्टेट हा व्यवसाय फार जोरावर असतो.

आणि अनुष्काने देखील या व्यवसायात पैशांची गुंतवणूक केल्याची समजते आहे. अनुष्काकडे रिअल इस्टेटमधे तब्बल 36 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती आहे. अनुष्का शर्मा हिने सिनेसृष्टीत भक्कमपणे पाय रोवल्यानंंतर निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. आणि सिनेनिर्मितीतून तिने आजवर चांगलाच भक्कम पैसा उभा केल्याच पहायला मिळालं आहे.

तिने तिच्या निर्मीती हाऊसच्या माध्यमातून आजवर अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्स केल्याच पहायला मिळालं आहे. अनुष्का शर्मा आज विराट कोहली याच्यासोबत तिच आयुष्य अगदी आनंदात घालवत असल्याची पहायला मिळते. अनुष्का शर्मा हिच्या संपूर्ण संपत्तीच्या आकड्यांनी अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं, हे निश्चित. सध्या अनुष्काच्या चाहत्यांना तिच्या लवकरच सिनेसृष्टीत पुर्नपदार्पणाची ओढ लागल्याची पहायला मिळते आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!