सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एकाच गोष्टीची प्रचंड चर्चा रंगल्याची पहायला मिळते आहे आणि ती म्हणजे, वहिणीसाहेबांनी त्यांच्या नवजात मुलाचा आता नामकरण सोहळा एकदाचा उरकून टाकला आहे. तर तमाम महाराष्ट्राच्या प्रेमावर खरी उतरलेली भुमिका म्हणजे, वहिनीसाहेब. म्हणजेच “तुझ्यात जीव रंगला” अशा नावाच्या झी मराठीच्या मालिकेत “नंदिता” या पात्राची नकारात्मक भुमिका ज्या अभिनेत्रीने आल्हाददायकरित्या योग्यतेत साकारली ती अभिनेत्री धनश्री काडगावकर.
धनश्री काडगावकर हिला मालिकेत मुख्यत: वहिनीसाहेब नावाने ओळखलं जात असायचं. आपल्या कौशल्यातली एक लकब व त्यासोबतच आपला रूतबा वेळोवेळी लोकांमधे पहायला आवडणाऱ्या व्यक्तिरेखेची तिची भुमिका होती. वहिणीसाहेब या पात्राला पुरेपूर नकारात्मकतेचा चेव चढवत धनश्री काडगावकरने खऱ्या अर्थानं आपल्या अभिनयाच्या कतृत्वाची थाप रसिकप्रेक्षकांच्या मनांवर अधिराज्य गाजवून मिळाली.
आणि अशा या पात्राला न्याय देणाऱ्या अभिनेत्रीच्या बाळाचं नुकतचं एक छानसं नाव ठेवल्या गेलेलं पहायला मिळतयं. बाळाचे फोटो आणि इतर बरेच ब्लेसिंग्जदेखील सोशल मीडियावर सध्या सक्रीय असलेले पहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच जेव्हा धनश्रीला पुत्रप्राप्ती झाल्याच सर्वांना माहित पडलं होतं, तेव्हा अनेकांना हा सुखद धक्का बसला होता. धनश्रीच्या घरी नव्या बाळाचं आगमन झालं आणि आता त्याचा नामकरण सोहळादेखील पार पडला असल्याच पहायला मिळालं आहे.
धनश्रीने आणि तिच्या कुटुंबाने बाळाचं नाव “कबीर” हे ठेवलं आहे. आणि आता या कबीरला सोशल मीडियावर सर्वांना ओंजारायला गोंजारायला चांगलीच संधी चालून आलेली पहायला मिळते. खरतरं धनश्री तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फार सक्रिय असल्याची वारंवार पहायला मिळते. धनश्रीचं बाळ अगदी गोंडस, गोड आणि प्रचंड तेज असलेलं पहायला मिळतं. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमधे सर्वजण तिच्या बाळाला पाहूच शकतात.
लग्नानंतर, आई होण्याच्या मार्गावर प्रेग्नंट असताना आणि त्यानंतर मुलाला जन्म दिल्यानंतरही धनश्री कायम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहिल्याची पहायला मिळाली आहे. तिने तिच्या चाहत्यांना कधीही निराश केलं नाही. धनश्री काडगावकरच्या बाळाच्या फोटोंनी सोशल मीडियात सध्यातरी चांगलाच धुमाकूळ घातल्याचा पहायला मिळतो आहे. धनश्री आणि तिचा नवरा या दोघांनीही तिच्या प्रेग्नंट असण्याची गोष्ट इन्स्टाग्रामवर “कुणीतरी येणार गं” अशा कॅप्शन देत शेअर केली होती.
काही दिवसांनंतर एकदा का मुलं हळूहळू वाढू लागलं की धनश्रीने पुन्हा योग्यवेळी टेलीव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला यावं, असा तिच्या चाहत्यांचा बराचसा हट्ट आहे. परंतु सध्याच्या घडीला तरी धनश्री तिच्या ठराविक गोष्टींकडे योग्य त्या ठिकाणी पाहत स्वत:ला एका चांगल्या दिशेतच घेऊन जाताना पहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!