तुम्हा सर्वांना आता अनेक लग्नबंधनाच्या कहाण्या या वर्षभरात घडत असलेल्या पहायला मिळाल्या आहेतच, त्यात आणखी नवी भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक असा प्रसिद्ध गाजलेल्या अभिनेत्याचा चेहरा ज्याने नुकतचं आपलं दुसरं लग्नही उरकून घेतलं आहे. “संग्राम समेळ” याचं नाव तुम्ही टिव्ही मालिकांमधून ऐकलं असेलच.
त्याने “सुखांच्या सरींचे हे मन बावरे” या मालिकेमधून अनेक रसिकप्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आणि याच अभिनेत्याने थेट चार वर्षभराच्या आत दोनदा लग्नाचा घाट घातल्याच पहायला मिळतं आहे. त्याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होऊन चर्चेचा विषय बनून राहिले आहेत.
मुळात त्याने यावेळी ज्या व्यक्तीसोबत विवाह केला आहे ती एक नृत्यांगना म्हणून प्रसिध्दीस आलेला गोंडस चेहरा असलेली अभिनेत्री आहे. श्रद्धा फाटक हे त्या अभिनेत्रीचं नाव आहे. ती मुळात एक डान्सर आणि उत्कृष्ट कोरिओग्राफर आहे. चाहत्यांना ही जोडी अफाट आवडलेली पहायला मिळत आहे. दोघांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर चाहते त्यांना लग्नाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असल्याचे पहायला मिळत आहेत.
खरतरं याआधी संग्राम याचा पहिला विवाह हा रूंजी सिनेमातली अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्यासोबत झाला होता. परंतु दोघांचेही पुढे न पटल्याने हे नातं घटस्फोटाच्या वळणाकडे गेलं आणि दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. रूंजीनंतर पल्लवी पाटील ही “अग्निहोत्र 2” या मालिकेत पहायला मिळाली होती. दुसरीकडे अभिनेता संग्राम हा पुढचं पाऊल या मालिकेतून अधिक प्रकाशझोतात आला होता.
अभिनेता संग्राम समेळ याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याने आजवर रसिकप्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाची दमदार छाप उमटवली आहे. संग्रामने छोट्या पडद्यावर तर आपली छाप उमटवली आहेच त्याशिवाय मोठ्या पडद्यावर विकी वेलिंगकर, उंडगा, स्विटी सातारकर यांसारख्या सिनेमांमधूनही आपला ठसा उमटविला आहे.
ब्रेव्ह हार्ट, ललित 205, बाप माणूस, यांसारख्या प्रोजेक्ट्समुळेदेखील तो ओळखला जातो. आपल्या अभिनयातील एक वेगळ्या शैलीचा बाणा जपणारा हा अभिनेता विशेषकरून तरूणाईत अधिक प्रसिद्ध आहे. मुंबईत जन्मलेल्या संग्रामने लवकरात लवकर मराठी टिव्ही मालिकांमधे काम करण्याची संधी मिळवली आणि तो त्यात दिवसेंदिवस सरस ठरत एक उत्कृष्ठ अभिनेता बनलेला आज पहायला मिळतो आहे.
अभिनेता संग्राम याची पहिली बायको अर्थातच पल्लवी पाटील. पल्लवी ही एक नाटकांमधून मराठी छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री आहे. तिने तिची प्रथम मालिका रूंजीमधील भुमिका साकारण्यापुर्वी चंद्रलेखा, प्रेम गंध यांसारख्या अनेक व्यावसायिक नाटकांमधून आपली छाप उमटवली होती. पल्लवी पाटील अभिनय कौशल्याच्या बाबतीत अनेक सिनेअभिनेत्रींनाही टक्कर देते.
तिला आजवर उत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. “मिटर डाऊन” ह्या आगळ्यावेगळ्या स्वरूपाच्या प्रोजेक्टसाठी तिचं विशेष कौतुक साऱ्या सिनेजगतात केल्या जातं. प्रेमा तुझा रंग कसा? या अशोक सराफ यांच्या प्रमुख भुमिकेतील नाटकामधेही पल्लवीची भुमिका फार अप्रतिमरित्या तिने साकारलेली पहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!