‘सैराट’मुळे तीन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

Sairat Movie

 

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र हवा आहे ती सैराटचीच. आर्ची आणि परशा यांची लव्हस्टोरी केवळ प्रेक्षकांना आवडलीच नाही तर त्यांनी ती डोक्यावर घेतलीये.

 

 

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने यापूर्वीच आपल्या नावावर केलेत. थिएटरमध्ये अद्यापही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल आहेत. महाराष्ट्रातच नव्हे भारतात आणि भारताबाहेरही या चित्रपटाला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय.

 

 

सैराटच्या या लाटेमुळे मात्र तीन मराठी सिनेमांचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागलेय. मेच्या दुसऱ्या आठवड्यात चीटर आणि पैसा पैसा हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. तसेच तिसऱ्या आठवड्यात टाईमपास फेम प्रथमेश परबचा ३५% काठावर पास हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.

 

 

मात्र सैराटचे शो हाऊसफुल्ल असल्याने या चित्रपटांना थिएटर मिळणे कठीण झालेय. याच कारणामुळे यांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलेय

 

सैराटने प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल २५ कोटींहून अधिक कमाई करुन नवा विक्रम प्रस्थापित केला होता. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा ४० कोटीहून अधिक असेल असे म्हटले जातेय. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here