‘२० म्हंजे २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
एनएफडीसी निर्मित “२० म्हंजे २०” ह्या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. दिग्दर्शक उदय भंडारकर यांचे दिग्दर्शन असलेला “२० म्हंजे २०” हा मराठी चित्रपट प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्रणालीवर भाष्य करतो. एन एफ डी सी नेहमीच नवीन कलागुणांना वाव देऊन,
त्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्याचाच एक भाग म्हणून “२० म्हंजे २०” एका आशयघन सिनेमाची निर्मिती केली. “२० म्हंजे २०” हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तसेच भारतातील कमी होणाऱ्या शासकीय शाळा का कमी होत आहेत,
तसेच किमान प्राथमिक शिक्षण मिळणे प्रत्येक विध्यर्थाचा मुलभूत अधिकार कसा आहे, या विषयीचे महत्व पटवून देतो. मृण्मयी गोडबोले व तिच्या सोबतचे सर्व बालकलाकार ज्यात प्रामुख्याने पार्थ भालेराव(भूतनाथ फेम),
मृणाल जाधव(दृश्यम फेम), मोहित गोखले, अश्मित पठारे,साहिल कोकटे आदी असून त्यांच्या सोबत अरुण नलावडे, राजन भिसे यांची ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
किल्ला फेम अविनाश अरुण यांचे छाया दिग्दर्शन असून दिपक जोशी व रविंद्र भागवते यांची कथा आहे. “२० म्हंजे २०” हा मराठी चित्रपट येत्या १० जूनला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून सर्व विद्यार्थी व पालक चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील असा मानस चित्रपटाचे दिग्दर्शक उदय भंडारकर व एनएफडीसीने व्यक्त केला.