मराठी सिनेसृष्टीतला एक नवा उभरता चेहरा म्हणजे, रूपल नंद. रूपल ही याआधी गोठ या मालिकेतून सर्वांच्या समोर आली होती. तिने आपल्या अभिनय कौशल्यातून रसिकप्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. गोठ ही एक वेगळ्या आशयाची मालिका टेलीव्हिजन क्षेत्रात दिसल्याने रसिकप्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद लाभला.
स्त्रियांचे निर्णय स्त्रियांच्या हाती असले पाहिजेत या आशयाला धरून गोठ या मालिकेचं कथानक वठवल्या गेलं होतं. अनेकदा सिनेसृष्टीत स्थिर करियर नाही असा विचार करत अनेकजण इंडस्ट्रीमधून बाहेरच्या वाटादेखील निवडतात. परंतु काहीजण याला अपवाद ठरत आहे ते स्थिर नोकरी अथवा इतर क्षेत्र सोडत सिनेमा इंडस्ट्रीला निवडतात. याच अपवादांपैकी एक असलेल्या रूपलने तिची नोकरी सोडत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
रूपलच्या अनेक गोष्टी रसिकप्रेक्षकांच्या नजरेत आलेल्या नाही, त्यांना रूपल नंद हिच्याबद्दल फारशी माहितीही नाही. परंतु तरीदेखील ती आज एक लोकप्रिय अभिनेत्री झालेली आहे. त्यामुळे आज आपण तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी इथे जाणून घेणार आहोत. रूपल नंद एक फिझीओथेरपीस्ट असून पुण्याच्या महाविद्यालयातून तिने हे शिक्षण पूर्ण केलं आहे.
पुण्यात शिक्षण घेत असताना रूपल ही ससून या दवाखान्यात इंटर्नशिप करत असायची. रूपलच्या घरात अगदी मोकळं वातावरण होतं, आणि लहानपणीच तिला अभिनयाची आवडही होती. पुण्यात शिक्षण घेत असतानाच पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या नाटकांच्या एकांकिकांमधून भाग घेत भुमिका साकारल्या होत्या. हळूहळू रंगभुमिकडे पाय वळू लागलेली रूपलच्या पुढील प्रवासाची तयारी फारच जोमाने चालू होती.
आधीपासूनच अंगवळणी पडलेल्या काही ठराविक साचेबद्ध सयवी व याशिवाय स्वत:च्या आवडींना प्राधान्य देणारी रूपल ही अभिनयासाठी स्वतःवर मेहनत घेऊ लागली होती. आणि मग तिने घरी आई वडीलांसमोर आपलं फिजिओथेरपिस्टचं करियर बाजूला ठेवून या क्षेत्रात काम करण्याचा प्रस्ताव मांडला. आपल्या मुलीवर पुर्णत: विश्वास ठेवत तिच्या प्रस्तावाला तिच्या आई वडीलांनी पाठींबा दिला.
मुळात सिनेसृष्टीत येण्याकरता रूपल नंद ही केवळ एका नाटकाच्या शोधाच्या संधीत होती असं ती स्वत:च सांगते. एका नाटकाच्या शोधात असलेल्या रूपलची एका ब्युटी काॅन्टेस्टमधे निवड झाली. यावेळी हजर असलेल्या परिक्षकांपैकी एका परीक्षकाने मला पाहून “मुंबई पुणे मुंबई” या सिनेमातून भुमिका दिली. या भुमिकेने मला सार्थ विश्वास मिळवून दिला हे नक्की, असंही रूपल म्हणते.
त्यानंतर तिला, “ॲण्ड जरा हटके” या सिनेमातूनही आपली कलाकृती दाखवण्याची संधी मिळाली. सध्याला “श्रीमंताघरची सून” ही मालिका चांगलीच पसंतीस उतरताना पहायला मिळत आहे. सोनी मराठी वाहिनीवर या मालिकेचं प्रक्षेपण सुरू आहे. रूपल नंद म्हणते, मला माझ्या शिक्षण घेतलेल्या क्षेत्रातही पुढे चालून काम करायचं आहे. परंतु त्याआधी पुर्ण आवड जपून घ्यायची आहे.
दर्जेदार भुमिका साकारायच्या आहेत, नाटकांमधून, सिनेमांमधून, मालिकांमधून… अर्थात उपलब्ध होईल त्या प्रत्येक चांगल्या प्लॅटफॉर्ममधून. रूपल तिची भुमिका अगदी उत्तमरित्या साकारते हे नेहमीच चाहत्यांनी आजवर पाहिलं आहे. रूपल नंद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याची आजवर अनेकदा पहायला मिळाली आहे. तिच्या या ना त्या माध्यमातून बऱ्याचदा चर्चा सर्वत्र होत असतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!