मराठी सिनेसृष्टीत सध्या चांगलीच प्रसिद्धी मिळत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रतिक्षा जाधव. देवमाणूस या मालिकेतील भुमिकेतून ती तमाम महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली आणि यानंतरही आता ती पम्मी च्या भुमिकेतून सर्वांच्या मनोरंजनास तुझं माझं जमतंय या मालिकेत अवतरली आहे.

अपुर्वा नेमळेकर हिला नाईलाजास्तव पम्मीची भुमिका सोडावी लागली आणि ती भुमिका मग प्रतिक्षा च्या वाट्याला आली. या भुमिकेला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न ती करताना आपल्याला सध्या पहायला मिळतं आहे. नुकतीच प्रतिक्षाची एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, सिनेसृष्टीत एकाच पैशे मिळवण्याच्या सोर्सवर तुम्ही अवलंबून नाही राहू शकत. त्यासाठी तुम्ही इतर कोणतही क्षेत्र निवडत त्यातून ठराविक पैसा मिळवला पाहिजे.

ती स्वतः सध्यातरी सलून, ब्युटी इन्स्टिट्यूट, कन्स्ट्रक्शन यांसारख्या कामांमधे कार्यरत आहे. अर्थातच ती एका उद्योजिकेचं कामही करताना पहायला मिळते आहे. ती मुलाखत देताना म्हणाली की, सिनेसृष्टी ही कधीच आजवर कुणासाठी थांबत नाही. सिनेसृष्टी एकप्रकारे चांगली आहेच पण त्याशिवाय इथल्या अनेक अस्थिर गोष्टींचा सामना करण्याची ताकद तुमच्यामधे असायला हवी.

प्रसिद्धी, ग्लॅमर आणि यश या इथे अगदी एका टप्यानंतरच्या गोष्टी आहेत. प्रतिक्षा जाधव हिने मुलाखत देताना तिचा आजवर झालेला सिनेसृष्टीतला प्रवास यावरदेखील भाष्य केलं. ती असंही म्हणते की, सिनेसृष्टीमधे संधीचा वापर करून घेणं हे जमलं पाहिजे. तिने आजवर अनेकदा आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकप्रेक्षकांना तिचा चाहतावर्ग बनवून सोडलं आहे.

अपुर्वाची पम्मी ही भुमिका मिळाल्याने प्रतिक्षा थोडीशी आधी चिंतेत होती. कारण एखादी व्यक्ती जेव्हा आधी भुमिका साकारते आणि तिची चांगली प्रसिद्धी मिळते तेव्हा नव्या कलाकारावर त्याच कामाचा तोच दर्जा राखून ठेवण्याची जबाबदारी येऊन पडते, याने कधीकधी भुमिका कशी होईल? प्रेक्षकांना किती प्रमाणात आवडेल? या सर्व गोष्टींचा एक दबाव येतोचं.

प्रतिक्षा म्हणते, माझ्या आधीच्या सर्व भुमिकांपेक्षा पम्मी ही भुमिका फार वेगळी ठरली आहे. पुण्याच्या एस पी कॉलेजमधे शिकलेली प्रतिक्षा आज एक चांगलीच नामांकित अभिनेत्री झाली आहे. कॉलेजमधे असताना ज्युडो खेळाडू, एक नृत्यांगना, विज्ञान विभागाची विद्यार्थीनी, पत्रकारिकता करणं, यांसारख्या विविध गोष्टींमधे नेहमी सरस असलेली प्रतिक्षा आज एका वेगळ्या पढावावर येऊन पोहोचली आहे असंच म्हणावं लागेल. तिने सर्वप्रथम एकदा सुमित म्युझिक यांच्याकडे काम केलं होतं यातून पुढे तिची निवड एका सह्याद्री वाहिणीच्या मालिकेसाठी झाली. तिने ते कामही चांगल्या पद्धतीने निभावलं.

पुढे सर्वप्रथम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच एक नाटक करून इतर नाटकांमधे भुमिका करण्याचा क्रम सुरू होतं गेला. आणि अभिनयातला रस अधिकच वाढला. यानंतर ती मालिकांकडे वळलेली पहायला मिळते. प्रतिक्षा म्हणते तिच्या दृष्टीने सिनेसृष्टी हे क्षेत्र थोडसं अस्थायी आणि असुरक्षितही आहे अनेकदा काही कलाकारांच्या खाजगी गोष्टी प्रखर्शाने मिडियात समोर आल्यानंतर नाहक बदनामी होते आणि पुढेतर सर्वच गोष्टी बदलून जातात.

परंतु कोणत्याही क्षेत्रात काही सकारात्मक तर काही नकारात्मक गोष्टी असतात तुम्हाला सर्वच अनुभव येत राहतात. त्यामुळे एकप्रकारे लढत राहणं महत्वाचं आहे. प्रतिक्षा आजवर नेहमीच एक सकारात्मक विचार घेऊन पुढे चालत आलेली अभिनेत्री ठरली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!