जय मल्हार या मराठी मालिकेने एक वेगळ्याच प्रकारचे किर्ती मान आजवर प्रस्थापित केल्याचे पहायला मिळते. या मालिकेच्या एकूण एक भागाला प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी, प्रतिसाद तर लाभलाच शिवाय अनेक कलाकारांचा चाहतावर्गही वाढीस लागला. यात “देवदत्त नागे” हा अभिनेता प्रमुख देव मल्हारच्या स्वरूपात पहायला मिळत होता. शिवाय त्याच्या एका पत्नीपैकी म्हाळसा झालेली अभिनेत्री म्हणजे सुरभी हांडे.
सुरभीची ओळख सर्व रसिकप्रेक्षकांच्या मनावर म्हाळसा या पात्रानेच निर्माण केली. सुरभीसाठी हे पात्र जरी निभावताना मोलाचं, जबाबदारीचं ठरलं तरी तितक्याच प्रभावीपणे तिने ते निभावलं आणि पुढे तिच्याही अभिनयाचं कौतुक सर्वत्र होऊ लागलं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सध्या अनेक सेलीब्रेटी रसिकप्रेक्षकांना भेटत असतात. त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा गेमदेखील खेळतात. आणि महत्वाचं म्हणजे, आपले विविध लेटेस्ट फोटोज तर कधी व्हिडिओज शेअर करतात.
या सर्व बाबींवर त्यांचे चाहते आवर्जून लक्ष ठेवून असतातचं. तर सध्या अशाच सेलीब्रेटीची बात म्हणजे “म्हाळसा” अर्थात सुरभी हांडे हिच्याबाबतीत आहे. “जय मल्हार” ही पौराणिक पार्श्वभूमीवर आधारित मालिका होती. त्यामुळे म्हाळसा निभावताना सुरभीच्या कौशल्याचा कमालीचा कस लागला होता, असं ती मुलाखतीत एकदा म्हणाली होती.
परंतु याच लोकप्रिय भुमिकेने खुप जास्त प्रसिद्धी, ओळख निर्माण करून दिली, याबाबत तिने रसिकप्रेक्षकांचे आभारही मानले होते. सुरभीच्या बाबतीत आता खरतरं कमालीचा बदल झालेला पहायला मिळतो आहे. आणि हाच बदल कदाचित तिच्या सोशल मीडियावरील अनेक चर्चांना उधाण निर्माण करताना पहायला मिळतो आहे. मुळात सुरभीच्या नव्या लुकबाबत अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
जय मल्हारमधील म्हाळसाच्या भुमिकेला जितका चांगला प्रतिसाद लोकांनी दिला. तितकाच चांगला प्रतिसाद सोशल मीडियावर तिला तिच्या नव्या ग्लॅमरस अदांना मिळत असल्याचं पहायला मिळतं आहे. म्हाळसाची भुमिका अक्षरश: पुरेपूर आवडल्यानंतर सुरभीला “लक्ष्मी सदैव मंगलम” या मालिकेतून काम करताना रसिकप्रेक्षकांनी पाहिलं होतं.
यानंतर म्हणजे, “अगं बाई अरेच्चा 2” मधेही तिची छोटीशी भुमिका पहायला मिळाली होती. सध्याच्या घडीला आपल्या सोशल मीडियावर भरपूर सक्रीय राहत असलेल्या सुरभीला तिच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या भरपूर कमेंट्स आणि लाईक्स मिळत आहेत. तिच्या नव्या ग्लॅमरस अदांनी जणू सोशल मीडियावर फारच वेगळं वातावरण निर्माण केलं आहे. अनेक ठिकाणी तिचे नवे ग्लॅमरस फोटो शेअरदेखील होत असल्याचे पहायला मिळत आहेत.
एकापेक्षा एक हटके फोटो आपल्या अकाउंटवरून अपलोड करणारी सुरभी मुळात 2019 या सालात लग्नबंधनात अडकली. दुर्गेश कुलकर्णी या आपल्या मित्रासोबतच तिचा विवाह झाला. त्यांच्या नात्याला खरतरं दोन्ही कुटुंबियांचा पाठींबा मिळाला आणि मग पुढे ही गोष्ट वर्कआउट झाली. सुरभी आणि दुर्गेश नंतर पुढे चालून पुण्यात पारंपरिक पद्धतीने लग्न करत विवाहबद्ध झाले.
मुळची जळगाव येथील असलेल्या सुरभीने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी स्वामी नावाच्या एका चांगल्या नाटकात भुमिका केली होती. सुरभीच्या घरात संगिताचा वारसा एकप्रकारे होताच, पुढे चालून ती सुगम संगीत कार्यक्रमाचा हिस्सादेखील झाली होती. सुरभीच्या इतर कामांबद्दल बोलायचं झालं तर मुळात अनेकांना ठाऊक नसेल पण हि तीच अभिनेत्री आहे जिने अंबट गोड या मालिकेत एक नकारात्मक भुमिका उत्तमरित्या वठवली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!