मित्रांनो! आजच्या घडीला टेलिव्हिजन मालिका पाहणाऱ्या रसिकांना त्यांच्या आवडत्या मालिका विषयी विचारले तर बहुतेकांचे उत्तर असेल, “तारक मेहता का उलटा चश्मा” कसे असते की काही गोष्टी क्लासिक असतात, ज्या कोणत्याही एका काळात नव्हे तर सलग बारा महिन्यांपर्यंत आपली छाप सोडतात.

असेही काही टीव्ही कार्यक्रम आहेत ज्यांनी अनेक दिवसांपासून स्वत:ला सिद्ध करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमांनी प्रेक्षकांचेही खूप मनोरंजन केले आहे. आपणास ठाऊक आहेच की गेल्या १३ वर्षांपासून टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम “तारक मेहता का उलटा चश्मा” ने लोकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

या लोकप्रिय शोचे ३००० च्या वर एपिसोड झाले आहेत या शोची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात काम करणारे कलाकार. होय, या शोमध्ये काम करणारे सर्व कलाकार आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावतात. आज आम्ही तुम्हाला शोमध्ये गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मंदार चांदवकर यांच्याबद्दल सांगणार आहोत. ज्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल.

मित्रांनो “तारक मेहता का उलटा चश्मा” गोकुळधामच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवणारा आत्माराम आपल्या वास्तविक जीवनात आहे करोडोंचा मालक. एवढेच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या अवॉर्ड शोज तसेच अनेक मराठी कार्यक्रमांमध्येही काम करतांना मंदार अनेकदा दिसला आहे. मीडिया सूत्रानुसार मंदारकडे २० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असून तो “तारक मेहता” या मालिकेच्या एका भागासाठी ४५००० रुपये मानधन घेतो.

मंदारने बर्‍याच अ‍ॅवॉर्ड शोमध्ये अँकर म्हणून काम केले असून त्यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. मंदार एक अभियंता आहे परंतु आपले अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने नोकरी सोडली आहे. मंदारने अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे, परंतु आत्माराम भिडे यांच्या भूमिकेमुळेच त्यांना ओळख मिळाली आहे.

वास्तविक, “तारक मेहता का उलटा चश्मा” मध्ये दिसल्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या माहितीसाठी सांगू की मंदारचा जन्म २७ जुलै १९७६ रोजी झाला होता आणि अभिनय करण्यापूर्वी १९९७ ते २००० या काळात, तो दुबईमध्ये काम करायचा. मंदारचा पहिला जॉब मेकॅनिकल इंजिनीअरचा होता. नंतर त्याने अभिनयासाठी जॉब सोडला आणि तो निर्णय योग्य होता कारण हाच भिडे आता रसिकांवर राज्य करतोय.