बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय यानं काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड एन्ट्री केली आहे. त्याचा पहिला सिनेमा बॅड बॉयचे पोस्टर खुद्द सलमान खाननं शेअर केले आहेत. यानंतर आता मिथुनची मुलगी दिशानी चक्रवर्ती बॉलिवूड डेब्यूसाठी तयार असल्याचं दिसत आहे. तसं तर अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र दिशानीचे काही फोटो समोर आले आहेत यात ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंवरून लक्षात येतं की, दिशानी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसला टक्कर देण्यासाठी तयार आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी दिशानीला दत्तक घेत तिचे संपूर्ण आयुष्य बदलवले आहे. दिशानी काही वर्षांपूर्वी एका कचराकुंडीत सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंडीत फेकून तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता. त्या रस्त्यावरून अनेकजण गेले. पण जीवाच्या आकांताने रडणाऱ्या त्या चिमुकलीला पाहून कुणी तिला दत्तक घेण्याचा विचार केला नाही.

एका बंगाली न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली होती आणि मिथुन यांनी ही बातमी वाचून या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मिथुन यांची पत्नी योगिता बालीनेही दिशानीचे मनापासून स्वागत केले. दिशानी प्रचंड स्टायलिश आणि सुंदर आहे. बॉलिवूड स्टार बनण्याचे सगळे गुण तिच्यात आहेत. दिशानीशिवाय मिथुनला तीन मुलगे आहेत. महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती अशी त्यांची नावे आहेत.

भलेही मिथुननं दिशानीला दत्तक घेतलं आहे. परंतु त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. दिशानीबद्दल आणखी बोालयचं झालं तर दिशानी सध्या न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीमधून अ‍ॅक्टींग कोर्स करत आहे. दिशानीनं अद्याप सिनेमात एन्ट्री केलेली नाही. दिशानीला लहानपणापासूनच अ‍ॅक्टींगची आवड आहे. बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे.

दिशानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. आपले फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. जन्माने दिशानी मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांची मुलगी नाही. मिथुन चक्रवर्ती दिशानीचे खरे वडील नाहीत. दिशानीला लहानपणी तिच्या आई-वडिलांनी कच-याच्या ढिगा-यात सोडलं होतं. मिथुन यांनी दिशानीला दत्तक घेतलं होतं.

दिशानीने एका शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे. सलमान खान, वरुण धवन आणि दीपिका पदुकोण दिशानीचे आवडते अभिनेते आहेत.दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीत अभिनयाचे धडे गिरवत आहे. दिशानी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वत:चे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात फोटोंमध्ये ती न्यूयॉर्क फिल्म अकादमीच्या फ्रेन्ड्ससोबत दिसतेय.