मित्रांनो!, बॉलिवूडच्या या झगमगत्या दुनियेत दरवर्षी कितीतरी लोक येतात आणि जातातही. काही लोक बड्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये बडी कामे करून स्वतःची जागा निर्माण करतात, स्टार, सुपरस्टार होतात तर काही सर्वसामान्य, ज्युनियर आर्टिस्ट बनून लाखोंच्या गर्दीत हरवून जातात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड इंडस्ट्रीमधीक अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत की जिने आपल्या कारकिर्दीच्या यशोशिखरावर असतांना अमिताभ, गोविंदा, राजेश खन्ना यासारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले.

आणि अनेक सुपरहिट चित्रपटांमधून पुरस्कारांसह रसिक आणि समीक्षकांची वाहवा देखील मिळविली, पण काही काळानंतर, ती या बॉलीवूड, प्रसिद्धी आणि एकूणच या झगमगाटापासूनच दूर गेली. आणि महत्वाचे म्हणजे, असे असूनही, ती आज एखाद्या महाराणी सारखे आलिशान आणि राजेशाही जीवन व्यतीत करीत आहे.

१९९० मध्ये आलेला स्वर्ग हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, गोविंदा आणि जूही चावला हे स्टार्स होते. हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट होता. त्यावेळेसचा हा चित्रपट हिट होता. आणि या चित्रपटात माधवी म्हणून एक हिरोईन होती. माधवीने स्वर्ग मध्ये राजेश खन्ना च्या बायकोचे पात्र साकारले होते.

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट गिरफ्तार मधले ‘धूप मे निकला ना करो’ ‘रूप की राणी’ मध्येही ती दिसली आहे.
माधवीने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘अंधा कानून’ आणि ‘अग्निपथ’ चित्रपटातही काम केले. माधवीने आपल्या करिअरची सुरुवात दक्षिण चित्रपटांमधून केली, त्यानंतर तिने १९८१ मध्ये ‘एक दूजे के लिए’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर अंधा कानून, ‘माझी शक्ती दो’, ‘ अग्निपथ’, मिसाल ‘,’ गिरफ्तार ‘,’ लोहा ‘,’ सत्यमेव जयते ‘,’ प्यार का मंदिर ‘,’ स्वर्ग ‘,’जखम’, ‘हार जीत’ यासारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले.

१९९४ मध्ये ‘खुदाई’ चित्रपटात ती अखेरची दिसली होता. आणि त्यानंतर ती बॉलिवूड मधून निवृत्त झाली. त्यानंतर माधवीचे लग्न तिचे गुरू स्वामी रामा यांनी फार्मास्युटिकल व्यावसायिक राल्फ शर्मा यांच्यासोबत करून दिले. राल्फ हे एक अब्जाधीश उद्योगपती असून आलिशान बंगले, प्रॉपर्टी, खाजगी विमान व हेलिकॉप्टर, लेटेस्ट कार्स व फार्महाऊसेस चे मालक आहेत.

माधवी आणि राल्फ यांची भेट हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ योगा सायन्स अँड फिलॉसॉफी संस्थेत झाली. त्यानंतर दोघांनी १९९६ मध्ये लग्न केले आणि तेव्हापासून माधवीने चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवले. माधवी सध्या आपल्या कुटूंबियांसह न्यू जर्सी येथे राहते. माधवी आणि राल्फ यांना प्रिस्किला, टिफनी आणि एव्हलिन या तीन मुली आहेत.