मित्रांनो!, बॉलीवूडच्या या मायनगरीतील एका अशा सुप्रसिद्ध अभिनेत्याची माहिती आज आपण घेणार आहोत, ज्याच्या हाती आजच्या घडीला ना एकही चित्रपट आहे नाही कोणती जाहिरात. मात्र तरीही तो अगदी आलिशान असे जीवन उपभोगतो आहे. या नशीबवान अभिनेत्याचे नाव आहे… विवेक ओबेरॉय. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय बद्दल सांगायचे झाले तर, त्याचा जन्म ३ सप्टेंबर १९७६ रोजी हैदराबादमध्ये अभिनेता सुरेश ओबेरॉय यांचे कुटुंबात झालेला आणि त्याच्या पालकांनी ठेवलेले त्याचे मूळ नाव विवेकानंद ओबेरॉय.

विवेकने सन २००२ मध्ये राम गोपाल वर्माच्या फिल्म कंपनीपासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या बॉलिवुडमधील प्रवेशाने बॉलीवूडला एक सशक्त अभिनेता मिळालाय असे त्यावेळी सर्वांना वाटे.. दिसायला हँडसम आणि तगड्या प्रकृतीचा असा हा हिरो प्रसिद्धीस पात्रही ठरला, कारण त्याने सर्वोत्कृष्ट पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता.

यानंतर तो रोड अणि दम या चित्रपटातही दिसला. या वर्षानंतर त्यांचा साथिया हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री राणी मुखर्जी देखील होती. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि तो तेव्हाच फेमस आणि स्टार व्हॅल्यू असलेला अभिनेता असल्याचे सिद्ध झाले.

त्यानंतरही विवेकने अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. ज्यामध्ये मस्ती, युवा, किसना: द वॉरियर पोएट, ओंमकारा, नक्शा, शूटआउट अॅट लोखंडवाला, मिशन इस्तंबूल, रक्त चरित्र, क्रिश 3, ग्रेट ग्रँड मस्ती, पीएम नरेंद्र मोदी आणि रुस्तम अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकला. आणि या सर्व चित्रपटातून विवेक ने चांगला अभिनय सुद्धा केला.

त्यात त्याला रसिक चाहत्यांनी देखील खूप प्रतिसाद दिला. परंतु यानंतर बऱ्याच काळ विवेक बॉलीवुड मध्ये जास्त कुठे दिसलाच नाही. ना कोणते मोठे काम, ना जाहिराती इ. परंतु त्याची संपत्ती बघून सर्वजण चकित होत आहेत. विवेक केवळ अभिनेताच नाही तर तो एका प्रथितयश प्रोडक्शन हाऊसचा मालकही आहे, ज्याचे नाव ओबेरॉय मेगा एन्टरटेन्मेंट आहे.

इतकेच नाही तर विवेक यांची स्वत:ची कंपनी कर्मा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड देखील आहे. सन २०१६ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने महाराष्ट्रातील शाहपूर येथे परवडण्याजोगे हाऊसिंग प्रोजेक्ट सुरू केले होते, त्याअंतर्गत १५ हजाराहून अधिक कुटुंबांना ७ लाख ९० हजार रुपये किंमतीला घरे द्यावी लागणार होती. या प्रकल्पांतर्गत विवेकने २०१७ साली छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांना महाराष्ट्रात ठाणे येथे २५ फ्लॅट देण्याचे ठरविले होते.

प्रसार माध्यमातून मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार, विवेक ओबेरॉयची एकूण मालमत्ता सुमारे १५ मिलियन डॉलर्स म्हणजेच १ अब्ज १० कोटींपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे जर आपण त्याच्या चित्रपटांबद्दल पाहिले तर विवेक एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये घेतो. विवेकने २९ ऑक्टोबर २०१० रोजी, प्रियंका अल्वाशी बेंगळुरू मध्ये लग्न केले होते, जी कर्नाटकचे मंत्री जीवाराव अल्वा यांची मुलगी आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्येही आहेत.