भारतातील पहिले इंटीग्रेटेड इनक्यूबेटर व्हेंचर कॅटालिस्ट्स आणि अॅसिलरेटर मंच व्हेंचर कॅटालिस्टसने भारताचा पहिला अॅसिलरेटर व्हीसी ‘९युनिकॉर्न्स’ फंडची सुरुवात केली ज्याद्वारे भारतातील सर्वोत्तम कल्पना आणि प्रारंभिक टप्प्यावरील स्टार्ट-अप्सची ओळख पटवता येईल. ९युनिकॉर्न्स फंड प्रारंभिक टप्प्यातील उच्च क्षमतेचे व्यवसाय ओळखेल ज्यात इलेक्ट्रिक व्हेइकल्स, मोबिलिटी, ऑग्मेंटेड रिअॅलिटी व्हीआर, एआय आणि एमएल, फिनटेक, रिटेल आणि एफएमसीजी स्टार्टअप्स सारख्या विविध क्षेत्रांचा समावेश होतो.
९युनिकॉर्न्स फंडमध्ये व्हेंचर कॅटालिस्टने ऑफर केलेल्या ३०० कोटी रुपयांचा समर्पित फंड आहे. निधीमधून अॅसिलरेटर व्हीसी प्रत्येक वर्षी १००+ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असून, जे स्टार्ट-अप वाढीची क्षमता दर्शवतील त्यांच्यात प्रारंभिक निधीपुरवठा फे-यांदरम्यान ५% इक्विटीच्या बदल्यात ६० लाख रूपयांचा व्यवहार करण्याचे आश्वासन देत आहेत व नंतरच्या निधीपुरवठा फे-यांदरम्यान रू. ३-५ करोड रूपये गुंतवायची शक्यताही आहे.
९यूनिकॉर्न्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अपूर्व रंजन शर्मा यांनी सांगितले की, “१३ आठवड्यांच्या कालावधीत, ९युनिकॉर्न्स फंड संस्थापकांना व्यावहारिक आणि टिकाऊ व्यवसाय मॉडेल तयार करण्यात आणि २१व्या शतकासाठी अनुकूल अशी अत्यंत सहयोगी कार्यसंस्कृती विकसित करण्यात मदत करेल, ज्याचा अभाव असणे हा स्टार्ट-अप अयशस्वी होण्याचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. “९ युनिकॉर्न्स फंड संकल्पना टप्प्यात फंडिंगला भारतात पुनरुज्जीवित करेल”