kon-hoeel-marathi-crorepatii-mahesh-manjrekar-and-sr-sonali-kulkarni-special




KON HOEEL MARATHI CORERPATI DIWALI SPECIAL WITH MAHESH MANJREKAR & MEDHA MANJREKAR (PADVA SPECIAL) AND SONALI KULKARNI AND SADESH KULKARNI (BHAUBHIJ SPECIAL).

कोण होईल मराठी करोडपती दिवाळी डबल धमाका !

कोण होईल मराठी करोडपतीद्वारे इच्छा माझी पुरी करा हा नवा उपक्रम

महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर पाडवा स्पेशल

सोनाली कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी सोबत रंगला भाऊबीज खास भाग

संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष आणि प्रसन्न वातावरण असत ते म्हणजे
दिवाळीमध्ये. सर्वत्र सुख, समृद्धी आणि आकाशकंदील, रोषणाई असते.

कलर्स मराठीच्या
नुकत्याच सुरु झालेल्या आणि ज्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे असा
महराष्ट्राचा महामंच कोण होईल मराठी करोडपतीमध्ये देखील दिवाळी दणक्यात सेलिब्रेट
करण्यात आली.

कोण होईल… द्वारे नेहेमीच गरजू लोकांना म्हणजेच ज्यांना पैशाची नितांत
आवश्यकता आहे त्यांना मदतीचा हात या कार्यक्रमाद्वारे दिला जातो. यावर्षी असाच प्रयत्न
दिवाळीच्या निमित्ताने करण्यात आला आहे एका अनोख्या पद्धतीने.




महाराष्ट्राचे लाडके दांपत्य
ज्याने नेहेमीच गरजू लोकांना मदतीचा हात दिला, त्यांच्या कठीण प्रसंगी खंबीर पणे उभे राहिले
आणि अर्थात महाराष्ट्राच लाडक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे महेश मांजरेकर आणि
त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर हे दिवाळी निमित्त कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर आले.
तसेच महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पहिल्यांदा तिच्या भावासोबत म्हणजेच
संदेश कुलकर्णीसोबत कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर भाऊबीज खास या भागासाठी आली.
हा दिवाळी विशेष भाग तुम्हाला ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी कलर्स मराठीवर रात्री ९ वा.
बघायला मिळणार आहे.

kon-hoeel-marathi-crorepatii-mahesh-manjrekar-medha-manjrekar

Kon Hoeel Marathi Crorepatii  Mahesh Manjrekar Medha Manjrekar Swwapnil Joshi

या दिवाळी विशेष भागामध्ये आलेल्या महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी नव क्षीतिज या
NGO साठी तब्बल ६ लाख चाळीस हजार रुपयांची मदत दिली. १ नोव्हेंबर पासून कोण होईल
मराठी करोडपती या कार्यक्रमा मध्ये इच्छा माझी पुरी करा हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला
आहे ज्याद्वारे गरजू लोकांना मदत करण्यात येईल. सोनाली कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी हे

“इच्छा माझी पुरी करा” या उपक्रमा अंतर्गतच खेळले आणि त्यांनी कर्णबधीर मुलांना म्हणजेच

पूजा आणि मिलिंद झवेरी यांना श्रवणयंत्राची मदत केली. यामुळे गरजू लोकांना मदत करण्याचे एक
मौल्यवान काम करण्यात आले जेणे करून त्यांची दिवाळी देखील सुख, समृद्धी आणि आनंदाने
जाईल याच समाधान कलर्स मराठी या वाहिनीला देखील मिळाले आणि या भागामध्ये आलेल्या

मांजरेकर दांपत्याला आणि कुलकर्णी परिवाराला लाभले.
महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक स्वप्नील जोशी यांच्याशी
दिलखुलास गप्पा मारल्या. आपली आजवरची कारकीर्द ते आवडता खेळ, खेळाडू याची माहिती

अगदी मजेदार पद्धतीने देत क्रिकेट खेळायला अजूनही आवडते पण फुटबॉल आणि टेनिस हे
खेळ बघायला आवडतात असे त्यांनी आवर्जून सांगितले. सध्या सुरु असलेल्या पाकिस्तानी
अभिनेत्यांनी भारतातील सिनेमे करू नये वा करावे या वादावर देखील एका वाक्यात परखड मत

देत म्हणाले “माझ्यासाठी माझा देश पहिला”. पाडवा विशेष या भागामध्ये मेधा मांजरेकर यांनी ये
राते ये मौसम हे गाण महेश जींसाठी गाऊन पाडवा भेटच त्यांना दिली. सोनाली कुलकर्णी आणि
संदेश कुलकर्णी यांनी देखील कोण होईल मराठी करोडपतीच्या सेट वर हजेरी लावली. सोनाली

आणि संदेश यांना पहिल्यांदाच टेलिव्हीजनवर एकत्र बघायला मिळणार आहे. त्यांनी आपल्या
काही खास लहानपणीच्या आठवणी देखील सांगितल्या. तसेच सोनालीने आपल्या भावासोबत काम
करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पडद्यासमोर वा पडद्यामागे आपल्या भावाला मदत करायची
आहे असे हि तिने सांगितले.

हे दिवाळी विशेष भाग तुम्ही नक्की बघा कलर्स मराठीवर ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी
रात्री ९ वा. बघायला मिळणार आहे.

 

starmarathi marathi star

star

 

star-marathi-in-logo

 

starmarathilogo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here