mrunal-dusanis-new-look




Mrunal Dusanis Marathi Actress New Look

दिवाळी उंबरठ्यावर असताना यश-जुईचा आनंद द्विगुणीत

As Sasar Surekh Bai अस्स सासर सुरेख बाई मधील जुई म्हणजेच सगळ्यांची लाडकी  Mrunal मृणाल मालिकेमध्ये
संसार आणि इनामदारांचा व्यवसाय अतिशय उत्तमरीत्या सांभाळते आहे. ज्यामध्ये तीला यशचा, तिच्या
घरच्यांचादेखील खंबीर पाठिंबा आहे. पृथ्वीराज म्हणजे जुईचे वडील मुंबईत होणाऱ्या बिझनेस
कॉनफरन्ससाठी पृथ्वी एंटरप्राइझ तर्फे विभाएवजी जुईची निवड करतात.

जुई आणि महाजन कुटुंबाचा
आनंद या बातमीने द्विगुणीत झाला आहे. यश जुईसाठी खूप खुश आहे. जुई या कॉनफरन्ससाठी जाते
आणि तिथे ती वूमन ऑफ द इयर (बिजनेस) हे अवार्ड जिंकते देखील. त्यामुळे या आनंदामध्ये आणखी
भर पडते. या कॉनफरन्ससाठी जुईने कॉर्पोरेट लुक पहिल्यांदा मालिकेमध्ये वापरला आहे. प्रेक्षकांसाठी जुईचा
हा कॉनफरन्ससाठी वापरलेला नवा लुक नक्कीच आवडेल.

mrunal-dusanis-marathi-actress




Mrunal Dusanis New Look

जुईला अचानक मिळालेले हे महत्व आणि अवार्ड विभाला अजिबात आवडत नाही. विभाचा जुईबद्दल
असलेला द्वेष फक्त संसार आणि व्यक्तीक इतकाच मर्यादित होता पण आता तो बिझनेस आणि
कामामध्येदेखील आला आहे. त्यामुळे विभा आता जुईसाठी कुठले नवीन संकंट आणील ? जुई याला कशी
सामोरी जाईल ?

महाजन आणि यश – जुईच्या आनंदाला गालबोट तर लागणार नाही ना?
हे सगळ बघण्यासाठी पाहत रहा “अस्स सासर सुरेख बाई फक्त कलर्स मराठीवर !

As Sasar Surekh Bai colors marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here