मित्रांनो!, बॉलीवूड चा भाईजान सलमान खान जरा मुडी स्वभावाचा परंतु एक दिलदार आणि जमेल त्याला जमेल तशी मदत करणारा माणूस म्हणून प्रसिद्ध आहे. कधी कधी हाच सल्लूभाई काहींना असे सल्ले देतो, की त्या व्यक्तीचे नशीब खुलते, बदलून जाते. अशाच एका आजच्या घडीला सुप्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीचा हा मनोरंजक किस्सा, खास तुमच्यासाठी.

हा किस्सा आठवायचं कारण म्हणजे नुकताच सुप्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी हिने आपला 29 वा वाढदिवस साजरा केला आहे. बॉलिवूडच्या सध्याच्या सुंदर, हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये कियारा आडवाणीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कियाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर अत्यंत कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. लवकरच कियारा आगामी चित्रपट ‘शेरशाह’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कियारा आडवणीचा जन्म 31 जुलै 1992 साली मुंबईत झाला. कियारा एका बिझनेसमन फॅमिलीत जन्माला आली आहे. कियारा आडवाणी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दुसऱ्या नावाने ओळखली जात होती. तिचे खरे नाव आलिया आडवाणी होते. बॉलिवूडमध्ये आधीपासूनच या नावाची अभिनेत्री म्हणजेच आलिया भट आहे. अशामध्ये सलमान खानने तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला आणि सलमानचा सल्ला सर-आंखोपर म्हणत तिने लागलीच स्वतःचे नाव बदलून आलिया चे कियारा असे करून घेतले. हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

कियाराचे शालेय शिक्षण आणि कॉलेज मुंबईमध्येच पूर्ण झाले आहे. कियाराच्या आजीने तिला वर्क एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी टिचिंग करण्याचा सल्ला दिला होता. कियाराला मुलांना शिकवायाला खूप आवडत होते आणि ती कुलाबाच्या अर्ली बर्ड स्कूलमध्ये शिकवायला जात होती. याठिकाणी कियाराची आई हेडमास्टर होती.

कियारा बद्दल आणखी सांगावयाचे झालं तर, सन 2016 मध्ये कियारा आडवाणीने नीरज पांडे दिग्दर्शित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सुपरहिट चित्रपटात काम केले. या चित्रपटातील सुशांत सिंह राजपुतच्या भूमिकेसोबतच कियाराच्या अभिनयाचे देखील प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.

या चित्रपटानंतर कियारा आडवाणी एकापाठोपाठ एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 2019 मध्ये कियाराचे दोन चित्रपट ‘कबीर सिंग’ आणि ‘गुड न्यूज’ प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटांव्यतिरिक्त कियारा आडवाणीने म्युजिक अल्बम आणि वेब सीरिज ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘गिल्टी’मध्ये देखील लक्षणीय काम केलेले आहे.