कुस्ती म्हणजे महाराष्ट्राचा लाडका खेळ. आज इतकी वर्ष झाली तरी महाराष्ट्राच्या मातीने पैलवान घडवण काही थांबलेलं नाहीये. जागतिक पातळीवर देखील भारतीय मल्लांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सोशल मिडीयावर एका सिनेमाची जोरदार चर्चा होताना आपल्याला पहायला मिळतेय. ‘शाळा’ सिनेमाच्या घवघवीत यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके घेवून येतोय, कुस्तीवर आधारित भव्य असा मराठी सिनेमा ‘केसरी’. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचं अनावर शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात झाल तेंव्हापासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळतेय.

काही दिवसापूर्वी टीझरने सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले, आणि ट्रेलर बघण्याची आतुरतेन वाट बघू लागले. आणि अखेर सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला. ट्रेलर बघून सिनेमा बघण्याची मात्र नक्कीच ओढ लागते यात शंका नाही.
आज आपण बघणार आहोत ट्रेलरमध्ये नक्क्की आहे तरी काय.  ‘शाहू महाराजांचे दिस गेले, जिथं कसरत आणि खुरकीचा खर्च सरकार घ्यायचं’ या आकर्षक डायलॉगपासून ट्रेलरला सुरवात होते. सर्वसामान्य घरातल्या पोराला कुस्तीचं वेड असल्याच समजतय. पुढे त्याला कुस्ती संघटनेकडून आर्थिक मदत मिळाल्याचा सिन सुद्धा ट्रेलरमध्ये बघायला मिळतो. गावातल्या मुलांकडून हाणामारी होते.

त्यात पुढे त्याला कुस्ती शिकण्यासाठी वस्तादाची गरज वाटते. त्यानंतर त्याला वस्तादही मिळतो. ‘युद्ध जिंकायला फक्त तलवारी चांगल्या असून चालत नाय, तलवार घट्ट धरायला मनगट बी मजबूत लागतं’ अशा जबरदस्त डायलॉगने ट्रेलर बघण्यात मजा येते. पुढे कुस्ती शिकण्यासाठी त्याची मेहनत आपल्याला दिसतेय. वस्तादाकडून कुस्ती शिकतानाचे काही जबरदस्त सिन दिसत आहेत.

एकंदरीत पैलवानाला येणाऱ्या आर्थिक अडचणी, कुस्तीत होणारं राजकारण, वस्तादाकडून कुस्ती शिकण्याची जिद्द. अशा सगळ्या गोष्टींना धरून दिग्दर्शक सुजय डहाके यांनी पैलवानाचा लढण्यापासून ते जिंकण्यापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसाठी पडद्यावर मांडला आहे याचा अंदाज नक्कीच लावू शकतो. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये तीन गाणी आपल्याला पहायला मिळतायत. ‘तू चल रे मना’ हे प्रेरणादायी गान नक्कीच लक्ष्य वेधी आहे. त्यानंतर पैलवानाच्या सरावा दरम्यान अस्सल मराठमोळा, रांगडा rap सुद्धा पहायला मिळतोय.

यानंतर ट्रेलरच्या शेवटी अशा एका गाण्याने आधीच धुमाकूळ घातला आहे, त्या गाण्यावर नक्कीच बेभान नाचावेसे वाटते. ‘पैलवान आला गं’ हे गान देखील नव्या ढंगात आपल्यासमोर येणार आहे. सिनेमात विराट मडके, महेश मांजरेकर, विक्रम गोखले,मोहन जोशी,नंदेश उमप,उमेश जगताप,छाया कदम, जयवंत वाडकर,रुपा बोरगावकर अशा जबरदस्त तगड्या स्टारकास्टने रंगलेला सिनेमा उत्सुकता वाढवतोय.

संतोष रामचंदानी यांनी या सिनेमाची निर्मित केली आहे. सिनेमातील गाणी ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केली आहेत.
मुळचा कोल्हापूरचा असलेला नवा चेहरा विराट मडके या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. महेश मांजरेकर या सिनेमात वस्तादाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. तगड्या कलाकारांचा तगडा अभिनय अविष्कार आपल्याला बघायला मिळू शकतो. ‘केसरी’ सिनेमाचा दिमाखदार,लक्ष्यवेधी ट्रेलर तुम्ही बघितला नसेल तर, लगेच बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.