ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय. अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. त्यामुळे सध्या अनेक मराठी चित्रपट कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रोमोशन व्यासपीठावर करतात. बोनस या चित्रपटाची टीमसुद्धा यावेळी युवा डान्सिंग क्वीनच्या सेटवर आली आणि त्यांनी भरपूर मजा केली. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत या दोन्ही कलाकारांनी युवा डान्सिंग च्या व्यासपीठावर भरपूर मजा केली.

पूजा सावंत ही उत्तम अभिनेत्री बरोबर उत्तम नर्तिकासुद्धा आहे. त्यामुळे युवा डान्सिंगच्या व्यासपीठावर तिने तिच्या नृत्याची झलक दाखवण्याची संधी जराही सोडली नाही. अधीर मन झाले या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य करीत तिने जजेस सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे मनही जिंकले. महत्वाचं म्हणजे तिने हे नृत्य साडीमध्ये केले. त्याच बरोबर तिने कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत दादरकर आणि स्पर्धक गिरीजा प्रभू, आयुषी भावे आणि क्षमा देशपांडे यांच्याबरोबर रॅम्प वाक सुद्धा केला. या रॅम्पवॉक मध्ये जज मयुरेश वैद्य कसा चालतो, सोनाली कुलकर्णी कशी चालते आणि अभिनेत्री गायत्री दातार कशी नाचत चालते याची एक मजेशीर झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली.

अशीच मस्ती आणि उत्तम डान्स परफॉर्मन्स पाहायचे असतील तर बघत राहा दर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता युवा डान्सिंग क्वीन फक्त झी युवा वाहिनीवर.