Kaccha Limbu Marathi Movie Release in 11 August 2017

1399
“कच्चा लिंबू’च्या पक्क्या कलाकारांची भूमिकाबदल!
सोशल मिडीयावर नुकतेच प्रदर्शित झालेले Kaccha Limbu ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचे पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकरांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. आणि याचे कारण म्हणजे या चित्रपटाद्वारे आपले आवडते कलाकार एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. या चित्रपटातून आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केलेला प्रसाद ओक दिग्दर्शकच्या तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव अभिनेत्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
स्वरूप रिक्रिएशन अँड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत कच्चा लिंबू या चित्रपटाची निर्मिती टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्सने केली आहे.  साध्या माणसांची ‘स्पेशल’ गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटामध्ये रवी जाधवसोबतच सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत पेम, अनंत महादेवन यांची प्रमुख भूमिका आहे.
 मंदार देवस्थळी निर्मित Kaccha Limbu ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.