‘जाऊंद्याना बाळासाहेब‘ ची प्रेस कॉन्फरन्स आणि म्युझिक लाँच सोहळा कलाकारांच्या उपस्थित दिमाखात पार पडला!!
Ajay Atul, Girish Kulkarni, Sai Tamhankar, Manva Naik, Bhau Kadam, Nandkishor Chaugule, Shreekant Yadav, Kunal Ganjawal and Nikhil Sane
‘सैराट‘ चित्रपटाने समाजातील वास्तवाचा जो दाहक अनुभव मांडला. तो अनुभव लोकांपर्यंत तेवढ्याच योग्य पद्धतीने पोहोचवला तो झी स्टुडिओज् आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी..
सैराटनंतर ही दोन्ही नावे आता पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत आपल्या आगामी चित्रपट ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’साठी
झी स्टुडिओजची प्रस्तुती आणि अजय- अतुल यांचे ‘सागा प्रॉडक्शन्सची’ निर्मिती असलेल्या व गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित हा
चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून येत्या ७ ऑक्टोबरला तो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
Jaundya Na Balasaheb 2016 Marathi Movie Mp3 Song Free Download
चित्रपटाची कथा आहे बाळासाहेब अण्णासाहेब मारणे या ग्रामिण भागातील एका युवकाची. ‘जाऊंदे’ या शब्दाच्या आधारावर बाळासाहेब आजवर जगत आलेला आहे.
सत्तेत असलेल्या राजकारणी वडिलांच्या कृपेमुळे आजवर तक्रार करावी असं त्याच्या आयुष्यात काही घडलेलंच नाहीये. राहायला मोठं घर, कामं करायला हातापायाशी नोकर, हिंडायला ड्राहव्हरसकट तैनात असलेली आलीशान गाडी.
पैसा आणि राजकीय सत्ता यांमुळे आलेल्या मग्रूरीची बाळासाहेबाला चांगलीच ओळख आहे. इतकं सगळं असूनही काहीतरी बिनसलेलं आहे.
राजकारणी वडिलांचा मुलगा असल्याने त्यानेही तीच परंपरा पुढे चालवावी आणि स्वत:ही नेता व्हावं अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते आहे. पण त्याला त्याची पर्वा नाहीये.
Jaudyana Balasaheb (2016) Video Songs Free Download
त्याच्या या स्वभावामुळेच एके दिवशी वडील त्याला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याचं आव्हान देतात. बाळासाहेबसुद्धा हे आव्हान स्वीकारुन घराबाहेर पडतो आणि इथुनच सुरु होतो शोध स्वत्वाचा.
या प्रवासात बाळासाहेबाला सापडते एक वाट जी या शोधात महत्वाचं माध्यम ठरते. या नव्या शोधात, नव्या प्रवासात त्याला कोण साथ देतं ? स्वार्थी राजकारणाची खेळी करणारे वडिल त्याच्या या नव्या भूमिकेचा स्वीकार करतात का ? आणि बाळासाहेबाला जगण्याचं मर्म सापडतं का? या सर्वांची गोष्ट म्हणजे ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ हा चित्रपट
‘जाऊंद्या’ मध्ये अजय-अतुल यांच्या संगीताने सजलेली पाच गाणी आहेत. यातही विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘डॉल्बीवाल्या’ या गाण्याचा. समाजमाध्यमांवर (सोशल नेटवर्कवर) काही दिवसांतच लाखाच्यावर हिट्स मिळवलेल्या या गाण्यांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
यातील ‘डॉल्बीवाल्या’, ‘ब्रिन्ग इट ऑन’ आणि ‘गोंधळ’ हे गाणं अजय-अतुल यांनीच लिहिलं आहे तर त्यांच्या सोबतीने ‘मोना डार्लिंग’ हे गाणं वैभव जोशी तर ‘वाट दिसू दे’ हे गाणं रुह यांनी शब्दबद्ध केलं आहे.
तर अजय गोगावले यांच्या सोबतीने सुमन श्रीधर, श्रेया घोषाल, सोनू निगम, कुणाल गांजावाला, नागेश मोरवेकर आणि योगीता गोडबोले यांनी ती स्वरबद्ध केली आहेत..
Jaundya Na Balasaheb Music Launch Posters