भात खाल्ल्याने शरीराचे वजन वाढत नाही. पण दिवसभरात मर्यादित स्वरुपात तसंच योग्य वेळी भाताचे सेवन करणं आवश्यक आहे. पोळीपेक्षा भात खाणे बहुतांश भारतीयांना आवडते. काही लोकांना दररोज वरण-भात-तूप खायला आवडतं तर काही जण राजमा-राइसचे चाहते असतात. कोकण तसंच दक्षिण भारतातील कित्येक पाककृतींमध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचा समावेश केला जातो.

काही लोकांचा तर भाताशिवाय स्वयंपाक पूर्ण होणे, जवळपास अशक्यच. पण दररोज भात खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं का? प्रत्येक दिवशी भात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात आणि शरीराला कोणते लाभ मिळतात? हे जाणून घेणे देखील आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक आहे.

तांदळामध्ये चरबी म्हणजे फॅट्सचे प्रमाण आणि नैसर्गिक स्वरुपातील साखर देखील कमी असते. तांदळाचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास शरीरात इ’न्सु’लि’न’चा स्रा’व संतुलित प्रमाणात राहण्यास मदत मिळते. तांदळामध्ये फा’य’ब’रची मात्रा भरपूर असते. यातील पोषक घटकांमुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. खराब को’ले’स्ट्रॉ’ल नियंत्रणात राहतं.

प्रत्येक दिवशी मर्यादित प्रमाणात तांदळाचे सेवन केल्यास शरीरातील खराब को’ले’स्ट्रॉ’ल’ची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यातील पोषक घटक शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करतात. पण भात खाल्ल्याने वजन कमी होतं की नाही, याबाबत प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. कारण ही बाब आपल्या चयापचयाच्या क्षमतेवर अवलंबून असते.

जास्त प्रमाणात भाताचे सेवन केलं तर चयापचयाशी संबंधित आ’जा’र होण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही दररोज भात खाऊ शकता पण त्याच्या प्रमाणाबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. भात खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते की वाढत नाही, यामागील नेमके सत्य काय आहे? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. याबाबत करण्यात आलेल्या अभ्यासातील माहिती जाणून घेऊया.

दररोज मर्यादित स्वरुपात तांदळाचे सेवन केल्यास शरीराच्या वजनावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत, अशी माहिती अभ्यासाद्वारे समोर आली आहे. पूर्वेकडील देशांच्या तुलनेत पाश्चिमात्य देशांमध्ये ल’ठ्ठ’प’णा ही सर्वात मोठी समस्या आहे. पण पूर्वेकडील देशांमध्ये पश्चिमेकडील देशांपेक्षा अधिक प्रमाणात तांदूळ खाल्ला जातो. याबाबत युनायटेड किंगडमचे नॅशनल ओ’बे’सि’टी फोरमचे चेअरमन टॅम फ्रे यांनी देखील मान्य केलंय की पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत पूर्वेकडील देशांतील लोकांमध्ये ल’ठ्ठ’प’णा’ची स’म’स्या कमी प्रमाणात आ’ढ’ळू’न येते.

दरम्यान पूर्वेकडील देशांमध्येही ल’ठ्ठ’प’णा ही मोठी स’म’स्या आहे. या देशांमधील लोकांच्या आहाराचा बारकाईनं अभ्यास केल्यानंतर त्यांच्या शरीराच्या वाढत्या वजनामागे भात खाण्याच्या सवयीस ज’बा’ब’दा’र धरता आले नाही. या संशोधनाशी जोडल्या गेलेल्या प्रोफेसर इमई यांनी सांगितले की, ज्या देशांमध्ये भात अधिक प्रमाणात खाल्ला जातो; तेथे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत ल’ठ्ठ’प’णा’ची स’म’स्या बरीच कमी आढळून येते.

भात खाण्याचे योग्य प्रमाण आणि योग्य वेळ: मर्यादित स्वरुपात भात खाणे आरोग्यासाठी जितके महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे भात योग्य वेळेत खाणेही आवश्यक आहे. तांदूळ पचनास अतिशय हलका आहे. दिवसभरात कोणत्याही वेळेत गरमागरम भात तुम्ही खाऊ शकता. पण दुपारच्या वेळेस भाताचे से’व’न आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

भारतीय पारंपरिक पद्धतीनुसार दुपारच्या वेळेस डाळ-भात आणि भाजी-पोळी खाल्ली जाते. तुम्ही दिवसभरात एक वाटी भात खाल्ल्यास शरीराचे वजन वाढण्याची स’म’स्या निर्माण होणार नाही. तसंच आपल्या आहारातील अन्य खाद्यपदार्थांवरही योग्य लक्ष ठेवून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

टिप :
वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता, ऍ’ल’र्जी, आहारक्षमता, पूर्वी व सध्याचे आ’जा’र व त्यावरील पथ्यपाणी लक्षात घेऊनच कोणताही डाएट प्लॅन व कृती अथवा उपाय करावा. या आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणेच इष्ट.