गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा “आयपीसी ३०७ ए” साकार राऊत निर्मित, स्वप्नील देशमुख दिग्दर्शित चित्रपटअभिनेता सचिन देशपांडेंचा नवा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत माफिया जगाचा किंवा गुन्हेगारी जगाचा वेध घेणारे फारच थोडे चित्रपट आजवर झाले. त्यातही अगदीच काही चित्रपटांनी उल्लेखनीय यश मिळवलं. आता “आयपीसी ३०७ ए” या चित्रपटातून माफिया जगाची आणि तरीही भावनिक कथा मांडण्यात आली असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संघर्षयात्रा, शिव्या असे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या साकार राऊत यांनी अर्थ स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून ‘आयपीसी ३०७ ए’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्नील देशमुख यांनी दिग्दर्शन केलं असून अभिनेता सचिन देशपांडे
प्रमुख भूमिका साकारत आहे. सचिन सोबत अन्य  कलाकारही यात प्रमुख भूमिकेत असून त्यांची  नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.


‘संघर्षयात्रा’ आणि ‘शिव्या’ या चित्रपटांतून साकार राऊत यांनी दिग्दर्शक म्हणून लक्षणीय कामगिरी केली होती. आता निर्मााता म्हणून त्यांनी निवडलेला विषय आणि संहिता चित्रपटाच्या रुपात पडद्यावर येत आहे. चित्रपटाच्या नावामुळे कायद्याच्या अंगानं जाणारा गुन्हेपट असंही “आयपीसी ३०७ ए” असा  चित्रपट म्हणता येईल. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही काळात नक्कीच मिळतील.