भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामधील सामना म्हणजे क्रिकेटरसिकांना मेजवानीच असते. भारत जगातील सर्वात चांगला क्रिकेट खेळणारा संघ म्हणून ओळखला जातो तर ऑस्ट्रेलिया एकेकाळचा जगज्जेता संघ आहे. ऑस्ट्रेलियाने एक पूर्ण दशक क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं होतं. एकेकाळी भारत ऑस्ट्रेलियासमोर क्रिकेटच्या बाबतीत फारच पीछाडलेला होता. पण त्यानंतर भारतीय संघाने अनेक महत्त्वपूर्ण व कठोर निर्णय घेत भारतीय संघात शिस्त आणि कौशल्य यांच्या वाढीवर भर दिला.

भारताची आज क्रिकेटच्या बाबतीत जगात असणारी ओळख प्रत्येकाला माहितीच आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच एक दिवसीय तीन सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला दोन 1 फरकाने धूळ चारली.

या मालिकेतील शेवटचा सामना बेंगलोर येथील के एम चिन्नास्वामी या मैदानावर खेळला गेला होता. हा सामना भारताने सात गडी राखत दणदणीत फरकाणे जिंकला यासोबतच भारताने ही मालिका देखील खिशात घातली. या सामन्या सोबतच भारताने मायदेशात दोनशेवा सामना जिंकण्याचा रेकॉर्ड देखील केला आहे. असा रेकॉर्ड करणारा भारत जगातील दुसरा संघ‌ आहे.

 

ही मालिका जिंकल्यानंतर अनेक भारतीय खेळाडूंना विविध प्रकारच्या अवॉर्ड आणि धनराशि देण्यात आल्या. जाणून घेऊयात कुठल्या खेळाडूला कुठला भेटला आणि कुठल्या खेळाडूला किती बक्षीस भेटलं.

रोहित शर्मा : या सामन्यामध्ये 128 मध्ये 119 धावा रोहित शर्माने केल्या. त्याच्या या शतकीय खेळीने भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. यासाठीच रोहित शर्मा याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला, सोबतच रोहित शर्माला एक लाख रुपये एवढा धनादेश देखील देण्यात आला.

रवींद्र जडेजा : या सामन्यामध्ये रवींद्र जडेजा याला केवळ एकच ओवर टाकण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं करत त्या ओवरमध्ये तब्बल दोन महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या. त्याच्या या कामगिरीमुळे रवींद्र जडेजा ड्रीम इलेव्हन गेम चेंजर ऑफ द मॅच या पुरस्कारासाठी निवडण्यात आला आणि त्यासोबतच एक लाख रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला.

विराट कोहली आणि रोहित शर्मा

या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 137 रणांची महत्त्वपूर्ण भागीदारी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जोडीने केली होती. ज्यामुळे, ऑस्ट्रेलियन संघ जेरीस आला होता. या दोघांच्या याच भागीदारीसाठी दोघांनाही अंबुजा अतुट जोडी असा पुरस्कार देण्यात आला. तसेच एक लाख रुपयांचा धनादेश देखील त्यांना देण्यात आला.

 

विराट कोहली : विराट कोहली सध्या भारतीय संघाचा कप्तान म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. या मालिकेमध्ये दोन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके केल्यामुळे त्याला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यासोबतच त्याला दोन लाख रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.