मित्रांनो!, अनेक धर्म, नानाविध जाती, जमाती आणि शेकडो भाषा आणि तशाच वेगळ्या खाद्यसंस्कृती सुद्धा आपल्या या भारत देशांत अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. आपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने आपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे.
परदेशात जाऊन खून-खराबा किंवा तत्सम विघातक कृत्ये करुन स्वतः बरोबर देशाचेही नाव मातीत मिळवणारी आपली भारतीय हिंदू संस्कृती नाही. कोविडच्या या संक्रमण काळात मनाला विरंगुळा, व्यायाम आणि स्वतःसोबतच इतरांचेही दोन घटका मनोरंजन केले. तेवढाच जरा तणाव कमी झाला तर त्यात वाईट ते काय?
चला तर मग सज्ज व्हा, कारण आम्ही आज तुमच्या करमणुकीसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला भारतीय असण्याचा गर्व वाटेल. हा व्हिडिओ लंडन येथील साऊथबँक येथे शूट करण्यात आला आहे. या भागात अनेक लोक फिरायला येतात. याचाच फायदा घेऊन काही भारतीय मुलामुलींनी त्या ठिकाणी रोडशो केला.
तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की,नेमके तिथे काय घडले ते. तर होते असे की, त्या गजबजलेल्या भागात एक मुलगी पहिल्यांदा डान्स करायला चालू करते. त्यानंतर त्यांच्याच ग्रुपमधून बाकी काही मुली तिला साथ द्यायला येतात आणि नंतर त्यांचा पूर्ण ग्रुप तिथे डान्स करायला येतो. अनेक हिंदी गाण्यांवर त्या मुलामुलींनी सुंदर डान्स केला. त्यांच्या डान्स स्टेप्स खूप छान आहेत आणि गाणे सुद्धा. येणारे जाणारे पर्यटक त्यांना पाहून दंग झाले.
बऱ्याच जणांनी मोबाईल, कॅमेरा मध्ये शूटिंग सुद्धा काढायला चालू केली. काहींनी त्यांच्याबरोबर डान्स करायला सुद्धा चालू केले. ‘कहेते है हमको प्यार से इंडिया वाले’ हे गाणे ज्यावेळी लागते तेव्हा ते ऐकून आणि त्यांचा डान्स पाहून अंगावर अक्षरशः शहारे येतात. तुम्हालाही हे गाणे ऐकल्यावर तसे वाटले का? हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा.
आणि हो!… हा डान्स लंडन मधील आहे, त्यामुळे मुलींच्या अर्ध्या चड्ड्या, तोकडे कपडे हे आधी डोळेभरून पाहून नंतर तथाकथित भारतीय संस्कृतीचे ढोल वाजविण्याची काही गरज नाही. अशा लोकांसाठी एकच की, ज्या देशात मुक्त संस्कृती आहे तिथे लोकसंख्या आणि स्त्रियांशी संबंधित गुन्हेगारी कमी आहे आणि आपल्याकडे पॉर्नबंदी, स्त्री अत्याचार विषयक कायदे असूनही लोकसंख्या व स्त्री अत्याचारात भरमसाठ वाढ आहे. संस्कृती ही कापड्यावरून नाही तर तुमच्या मनांतील विचारांतून, आचरणातून, आणि खऱ्या भावनांतून दिसत असते. तेंव्हा पोरींच्या भावना समजून घ्या… व्हिडिओचा आनंद घ्या!!!