नुकताच भारताचा सलामीचा अगदी तडाखेबाज खेळी करणाऱ्या रोहीत शर्माचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तो आता ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि अशातच त्याच्या अवतीभवती अनेकदा नानविध गोष्टी फिरलेल्या आपल्याला पहायला मिळतात. त्याच्या नावावर आज अनेक अशक्य असे विक्रम त्याने केलेले पहायला मिळतात.
केवळ भारतीय क्रिकेट संघातच नाही तर आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही रोहीत शर्मा याचा दबदबा अगदीच जबरदस्त असल्याचा पहायला मिळतो. तर मुळात आज जवळपास रोहीत शर्मा याची फॅन फॉलोविंग अगदी भरगच्च असल्याची पहायला मिळते आहे. आणि अशा या रोहीत शर्माच्या आयुष्यात एक फारच विचित्र गोष्ट घडून गेल्याची आपल्यला पहायला मिळाली होती. आणि या घटनेला चक्क भारतीय क्रिकेट संघाचा खुद्द कप्तान विराट कोहली जबाबदार असल्याचं समजतं आहे.
आता अनेकांना माहीतच आहे, विराट आणि रोहीत त्यांच्या वैयक्तिक जीवनात दोघेही स्थिरावले आहेत. विराटला नुकतच कन्यारत्न प्राप्त झालं आहे. तर दुसरीकडे रोहीतला एक मुलगी आहे आणि रोहीतची पत्नी रितिका आहे. रोहित शर्माने त्याच्या खेळात अनेकदा रितिकाला बरेच गिफ्ट चक्क त्याच्या इनिंगच्या परफॉर्मन्समधून दिल्याचेही पहायला मिळाले आहेत.
रोहीत नेहमीच कुल राहताना आणि झालं गेलं सोडून दिलं असा काहीसा ॲटीट्यूड ठेवून मैदानावर वा इतर ठिकाणी पहायला मिळतो, याच उदाहरण एकदा विराटने मुलाखतीतही दिलं होतं. तर मुळात विराट आणि रोहीत भारतीय क्रिकेट संघाचे आज दोन महत्वाचे पैलू असताना काही वर्षांपूर्वीचा हा किस्सा आपण पाहुयात. ज्यामुळे दोघांच्या मैत्रीत थोडासा दुरावा आल्याच पहायला मिळालं होतं.
मुळात ही गोष्ट आहे भारताच्या हिटमॅन असलेल्या रोहीत शर्मा याच्या पहिल्या प्रेमाची. होय, हे अगदी खरयं की त्याच पहिलं प्रेम कोणावर तरी होतं, आणि तेदेखील एका सेलिब्रिटीवर. सोफिया हयात या सेलीब्रेटीसोबत रोहित शर्माच पहिलं प्रेम झालं होतं. सोफिया आणि रोहीत शर्मा दोघेही एकमेकांना डेट देखील करत होते.
अर्थात याची कबुली एका ट्विटमधून स्वत: खुद्द सोफियाने दिली होती. प्रसारमाध्यमांमधे त्या काळात रोहीत आणि सोफियाचे एकत्रित फोटोदेखील प्रसिद्ध झाले होते. मात्र एका गोष्टीमुळे रोहीत आणि सोफिया यांच नातं तुटलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण ज्यामुळे दोघांच नातं तुटलं ती गोष्ट म्हणजे विराट कोहली होता. रोहित शर्माचा जिव सोफियावर आल्याने दोघेही एकमेकांना दोघे डेट करत होते.
पुढे चालून गोष्टी अशा काही प्रसिद्ध झाल्या आणि समजलं की, दोघांचही आता ब्रेक-अप झालेलं आहे. रोहित शर्मा मात्र या प्रकरणावर काहीच बोलला नव्हता. परंतु सोफियाने मात्र ट्विट करत विराट कोहलीमुळे हे ब्रेक-अप झाल्याच स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर विराट आणि सोफियाचेही एकत्रित फोटो चांगलेच प्रसिद्ध झाले होते. रोहीत शर्मा पेक्षा विराट चांगला खेळाडू आहे, त्यामुळे मी रोहीतला सोडून आता विराटसोबत आहे; असं म्हणतं तिने रोहितला डावललं असं सोफियाने म्हटलं होतं.
आणि या प्रकरणावरून नंतर रोहीत विराट दोघांमधे काहीकाळ नाराजगी राहिली होती. परंतु आज रोहीत रितिका ही जोडी चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगताना पहायला मिळते आहे. दोघांची चांगली मैत्री जमली आणि त्याच रूपांतर प्रेमात होऊन आज दोघे एकमेकांसोबत लग्नबंधनात आयुष्य घालवत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!