ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचे नाव जोडल्यापासून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान देखील खूपच चर्चेत आला आहे. पूजा भट्ट, जॉनी लीव्हर, तापसी पन्नू, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि हृतिक रोशनसह अनेक स्टार्स खान कुटुंबाच्या समर्थनार्थ बोलले आहेत. अशा स्थितीत आता विशाल ददलानी यांनीही एक ट्विट केले आहे.

चित्रपट निर्माते धुपाश्विनी यांचा प्रश्न खरंतर चित्रपट निर्माते धुपाश्विनी यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली. आपल्या ट्विटमध्ये धुपाश्विनीने प्रश्न विचारला आहे, ‘गेल्या 30 वर्षांत शाहरुख खानसोबत काम करणारे किती निर्माते आणि दिग्दर्शक आज त्याच्यासाठी उभे आहेत?’ या ट्विटला उत्तर देताना विशाल शाहरुखच्या समर्थनार्थ बोलला.

विशालचे ट्विट काय आहे विशालने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘जर म्यूजिक कंपोजर्सची गणना केली जात असेल तर मी यामध्ये आहे. अदानी बंदरावरील 3000 किलो तालिबानी ड्रग आणि भाजप नेत्याच्या मुलाकडून झालेल्या शेतकर्‍यांच्या हत्येककडून लक्ष हटवण्यासाठी शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाचा वापर केला जात आहे.

कोर्टाने जामीन अर्ज फे’टाळल्यानंतर आर्यन खान आणि इतर आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागत आहे. तुम्हाला माहीतच असेल कि हे संपूर्ण प्रकरण क्रूझ जहाजावरील ड्र’ग्स पार्टीशी संबंधित आहे. एनसीबीने को’केन, मे’फेड्रोन, च’रस, हा’यड्रोपोनिक आणि एमडीएमए सारखी अनेक ड्र’ग्स जप्त केली आहेत आणि रोख 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत.