प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये नटुकाकाची भूमिका साकारणारे अभिनेता घनश्याम नायक आता आपल्यात नाहीत. घनश्याम नाईक, जे टीव्ही जगताशी आणि चित्रपट जगताशी दीर्घ काळापासून जोडलेले होते, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी या जगाला निरोप दिला. घनश्याम नायक यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

घनश्याम नाईक यांनी अनेक गुजराती हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे, परंतु तारक मेहता या मालिकेतून त्यांना खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्यांनी नटुकाकाची भूमिका केली आणि खऱ्या जीवनात देखील लोक त्यांना त्याच नावाने ओळखायला लागले. या शोमुळे घनश्याम नायक प्रत्येक घरात प्रसिद्ध झाले.

नटुकाकांच्या मृ’त्यूनंतर त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावर विविध प्रकारे श्रद्धांजली अर्पण करत आहेत. शोच्या कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून नटुकाकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तारक मेहतामध्ये घनश्याम नायक जेठालालच्या गडा इलेक्ट्रिकमध्ये व्यवस्थापकाची भूमिका बजावत होते.

तारक मेहता मध्ये दाखवलेलं गडा इलेक्ट्रॉनिक्स प्रत्यक्षात मुंबईच्या खार भागात आहे. गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या खऱ्या मालकाचे नाव शेखर गडीयार आहे. पूर्वी या दुकानाचे नाव शेखर इलेक्ट्रॉनिक्स होते, पण तारक मेहताच्या शूटिंगनंतर दुकानाचे नाव बदलून गडा इलेक्ट्रॉनिक्स करण्यात आले. दुकान आता शूटिंगसाठी भाड्यावर आहे.

गडा इलेक्ट्रॉनिक्सशी नटूकाकांच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. बाघा आणि नटूकाका यांच्या जोडीने या दुकानात खूप हशा पिकवला आहे तर जेठालालसह या तिघांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आता, नटूकाकांच्या नि’धनानंतर, गडा इलेक्ट्रॉनिक्सचे मूळ मालक शेखर गडीयार यांनी नटूकाकांना विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.

गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात नटूकाका ज्या खुर्चीवर बसत असायचे त्यावर शेखर गडियार यांनी नटूकाकांचा एक फोटो ठेवला आहे, सोबत ‘लव्ह यू घनश्याम काका, मिस यू नटूकाका’ असे कॅप्शन आहे. हा व्हिडिओ शेखर गडीयार यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. जो खूपच व्हायरलही होत आहे.

गडा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक शेखर गडियार अनेक वेळा नटुकाकांसोबत दिसायचे. ते कधीकधी त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो आणि गडा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित अनेक आठवणी शेअर करत असतात.