घरात आईने गोडधोड पदार्थ बनवले की, तिच्या कपाळावर आठ्या पडलेल्या तुम्ही कधी पाहिल्या आहेत का बरं? अहो, कारण या मुंग्या खूपच नाकीनऊ आणतात. अगदीच क्षणभरात त्यांची सारी जत्रा त्या गोड पदार्थांभोवती निर्माण होते. या मुंग्या कित्येक लोकांच्या घरी गोळा होतात. सतराशे साठ उपाय जरी केले, तरी या काही जाण्याचे नाव घेतच नाही.

मित्रांनो असे तुमच्याही घरात होते का हो… परंतु तुम्हांला माहित आहे का? शास्त्रानुसार या मुंग्याचे आपल्या घरात असण्यामागे बरेचसे शुभ व अशुभ संकेत हे तुमच्या आयुष्याशी निगडित असतात. त्यामुळे या मुंग्यांकङे मुळीच दुर्लक्ष करू नका.

घरातील मुंग्या ह्या कोणत्या दिशेकङून निघतात आणि त्यांची ती लांबच लांब रांग नेमकी कुठे बरं जाते. यावरून तुम्हांला तुमच्या भविष्यात काय घडणार आहे, हे समजते. याशिवाय घरात निघणाऱ्या मुंग्या या नेमक्या कोणत्या रंगांच्या आहेत, यावरून देखील तुम्हांला भविष्यात होणाऱ्या सरप्राईज घटनांबद्दल माहित होते, आता हे कसे बुवा…. हा विचार तुम्हांला देखील पङलाच असेल. चला तर मग पाहूया, मुंग्यांचे हे रहस्यमय गुपित काय आहे.

लाल मुंग्यांचे संकेत : घरातील कोणत्याही कोपऱ्यात लाल रंगांच्या मुंग्या निघाल्या, तर तुम्ही आवर्जून सावधान व्हा. कारण लाल रंगांच्या मुंग्यांना खूपच अशुभ मानले जाते. लाल रंगाच्या मुंग्या निघण्याचा अर्थ म्हणजे तुमच्यासोबत काहीतरी वाईट गोष्ट घङणार आहे. कारण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे लाल रंगांच्या मुंग्यांसोबत आर्थिक सं’क’टे जुळलेली असतात.

लाल रंगाच्या मुंग्यांच्या निघण्यामागे संकेत असा आहे की, येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हांला धनप्राप्ती संबंधी सं’क’टे निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचे खर्च हे अचानकपणे वाढण्याचीही गडद शक्यता दिसून येते. परंतु लाल रंगांच्या मुंग्यांच्या तोंडात अंडी असतील तर तुमच्या जीवनात अचानकपणे धनप्राप्ती होणार असल्याचे देखील शुभ संकेत आहेत.

काळ्या मुंग्यांचे संकेत : तुमच्या घरात काळ्या रंगाच्या मुंग्या येत असतील, तर तुम्ही आनंदी होऊ शकता. कारणही अगदी तसेच आहे. काळ्या रंगाच्या मुंग्या या अतिशय शुभ मानल्या जातात, म्हणून तर त्यांना देवाच्या मुंग्या असे म्हणतात. या रंगांच्या मुंग्यांमुळे सुख आणि ऐश्वर्य प्राप्ती होते.

काळ्या रंगाच्या मुंग्या घराच्या उत्तर दिशेकङून येत असतील तर तुम्ही समजू शकता की, तुम्हांला काही खास शुभ्र वार्ता ऐकायला मिळणार आहेत. परंतु पूर्व दिशेकङून येणाऱ्या मुंग्या असतील, तर तुम्हांला धन प्राप्तीचा लाभ होण्याचा शुभ संकेत आहे.

या चुका मुळीच करू नये : घरात मुंग्या दिसल्या की, आपण त्यांना मा’रा’य’चे प्रयत्न करतो. काहीजण त्यांना घासलेट टाकून जीवंत मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे खरं तर खूप भयानक पाप आहे. मुंग्यांना मारल्याने आपण देखील पापाचे भागीदार बनतो. यामुळे चुकूनही घरातील मुंग्यांना इजा पोहोचवू नये.

तुमच्या घरात काळ्या मुंग्या निघाल्या, तर तुम्ही त्यांना खाण्यासाठी साखर, पीठ असे खाद्यपदार्थ नक्की द्या. असे केल्याने तुमच्या हातून काही पा’प घङले असेल तर त्यातून तुम्हांला मुक्ती मिळते व घरात सदैव शांतता टिकून राहते.

घरात निर्माण होणाऱ्या मुंग्यांपासून तुम्ही वैतागून गेले असाल तर त्यांना मारण्याऐवजी त्यांच्यावर चिमटीने हळद सोङा. असे केल्याने मुंग्यांचे निघणे, हे कायमस्वरूपी बंद होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका. आम्हांला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.