सध्या, ह्या गाण्यासंदर्भात महाराष्ट्रातील तरुणाईचे खास व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. तर काय आहे ह्या व्हायरल व्हिडिओमध्ये जाणून घेवूयात. ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ हे गाणं रिलीज झाल्याबरोबर अवघ्या काही तासांमध्ये सोशल मिडीयावर वाऱ्यासारख पसरत गेलं. प्रणव रावरानेचे मिश्कील हावभाव आणि सायली संजीवच्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

दाक्षिणात्य सिनेमातील गाण्याप्रमाणे हे मराठमोळ गाणं प्रेक्षकांना आकर्षित करू लागलं. सायली संजीव आणि प्रणव रावरानेच्या डान्स स्टेपची तरुणाईला भुरळ पडली. ह्या गाण्यातील हुक स्टेप करत तरुणीईने गाण्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर अपलोड करायला सुरवात केली. बघता बघता, ह्या हुक स्टेपच्या डान्सचा सोशल मिडीयावर ट्रेंड आला. ह्या गाण्याची डान्स स्टेप करनं म्हणजे चॅलेंज आहे अस, प्रत्येकाला वाटू लागलं. आणि व्हायरलच्या ताब्यात गेल हुक स्टेप चॅलेंज.

सोशल मिडीयावर ‘आटपाडी नाईट्स’ ह्या सिनेमाचे आकर्षक पोस्टर आणि मोशन पोस्टर नेटकऱ्यांना भुरळ पाडत आहे. काही आठवड्यांपूर्वी सिनेमाचा टीझर आपल्या भेटीस आला. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमाची कमालीची उत्सुकता वाढताना दिसत आहे. त्यानंतर आटपाडीच्या लैला मजनूचं अतरंगी प्रेम दाखवणारं ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ हे धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. नेटकऱ्यांनी ह्या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतले. तमाम महाराष्ट्रामधून मुला मुलींनी ह्या गाण्याचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करायला सुरवात केली.

तरुणाईमध्ये हे गान सध्या उर्जात्मक ठरतंय, हे ह्या गाण्याचं यश म्हणव लागेल. नारायण पुरी यांच्या लेखणीतून उमटलेल्या गाण्याला, तरुणाईच्या हृदयातला आवाज म्हणजे आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केले. आटपाडीच्या ह्या नाजूक जोडप्याच्या प्रेमाला संगीतमय केलं विजय गावंडे यांनी. आणि ह्या सगळ्यांच्या मेहनतीने भावना जिवंत होतील इतक्या ताकदीच हे गाणं तयार झालं.  तर मंडळी, ह्या धमाल डान्स स्टेपचं चॅलेंज तुम्ही स्वीकारलं नसेल तर दाखवा तुमचा दम आणि व्हा व्हायरल.
आटपाडी नाईट्स सिनेमा येत्या २७ डिसेंबरला तुमच्या जवळच्या थेटरमध्ये पहायला विसरू नका.