कृतिका गायकवाड ही अभिनेत्री आशियाना (२०१४ ) , लाखों है यहा दिलवाले ( २०१५ ) , विठ्ठला शप्पथ ( २०१७ ) आणि धुमस (२०१९ ) या चित्रपटांमुळे प्रसिद्धीस आली. मुख्य अभिनेत्री म्हणून काम करता करता तिने काही चित्रपटांमध्ये कॅमिओ डान्सर म्हणून सुद्धा काम केले.त्यातील मुक्ता बर्वे हिची मुख्य भूमिका असलेल्या बंदिशाळा या चित्रपटामधील तिची लावणी भरपूर गाजली. ज्यात शृंगारिक शब्दांना जुळणारे अत्यंत शृंगारिक हावभाव आणि ज्याला ‘दिलखेचक’ म्हणता येईल असे नृत्य तिने सादर केले.अर्थात लावणी जितकी महत्वाची असते तितकीच महत्वाची ती सादर करणारी नृत्यांगना असते. त्यामुळे कृतिका गायकवाड हे नाव तिच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाले.

झी युवा या वाहिनीवर ११ डिसेंबर पासून रोज रात्री ९:३० वाजता दर बुधवार ते शुक्रवार एक नवीन सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी शो सुरु झालाय. यात एकूण १४ सेलिब्रिटी डान्सर्स एकमेकींशी युवा डान्सिंग क्वीन होण्यासाठी झुंज देणार आहेत. या १४ सेलिब्रिटी डान्सर मध्ये अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने सुद्धा बाजी मारली आहे . पहिल्याच एपिसोड मध्ये तिने , सई ताम्हणकर वर चित्रित झालेलं गुलाबाची कळी हे ‘ तू ही रे’ चित्रपटातील गाण्यावर एक सुंदर परफॉर्मन्स दिला बॉलिवूड स्टाईल फॉर्म मधील हे गाणं कृतिकाचं मराठीतील सर्वात आवडतं गाणं आहे . त्याचबरोबर हे गाणं संगीतकार अमितराज यांनी बनवले असून वैशाली सामंत यांनी गायलं आहे आणि बंदिशाळा या चित्रपटातील लावणी करताना सुद्धा या दोघांशी तिचा संपर्क आला असल्याने तिला हे गाणं करताना मजा आली.युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात अभिनेत्री कृतिका गायकवाड चे आणखीही भरपूर परफॉर्मन्स आपल्याला पुढच्या भागात पहायला मिळतील.

या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वैत दादरकर असून हिरकणी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शो चे परीक्षण करणार आहेत.