भारतात 4 पैकी 3 लोक हे हार्ट अटॅकने मृत्यू पावतात. तुम्हाला माहिती आहे का हार्ट अटॅक कधीच अचानक येत नाही. त्याआधी शरीर तुम्हाला पूर्वसूचना देते पण त्याकडे केलेले दुर्लक्ष जीवघेणे ठरते. चला तर जाणून घेऊ या त्याबद्दल. हार्ट अटॅक म्हणजे जेव्हा रक्त घट्ट झाल्याने हृदयातील रक्त प्रवाह रोखला जातो. ऑक्सिजनची कमतरता भासते आणि पेशी मरण पावतात.

महिलांमध्ये साधारणतः वयाच्या 55 आणि पुरुषांमध्ये वयाच्या 45 वर्षानंतर हार्ट अटॅकचा धोका जास्त संभवतो. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त आढळून येते. अनुवंशिकता, धकाधकीचे जीवन, कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण ह्यांसारखी अनेक कारणे हार्ट अटॅकला निमंत्रण देतात.

छाती जड वाटणे, मळमळ, अपचन, छातीत जळजळणे ही हार्ट अटॅकची प्राथमिक लक्षणे आहेत. ऍसिडिटीशी संबंधित लक्षणे म्हणून ह्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ऍसिडिटी आणि हार्ट अटॅक ओळखण्यात गफलत होते.

छातीत दुखणे आणि हे दुखणे खांदे, घसा किंवा जबड्यात पसरणे हे हार्ट अटॅकमध्ये प्रामुख्याने आढळणारे लक्षण आहे.
ह्याशिवाय सतत घाम येणे, कमी न होणारा कफ, पाय सुजणे, अनियमित हृदयाचे ठोके ही देखील हार्ट अटॅक येण्या आधीची लक्षणे ठरू शकतात.

हार्ट अटॅकवर प्राथमिक उपचार

हार्ट अटॅकवर झटकन उपचार मिळाल्यास एखाद्याचे जीवन वाचवता येते. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.अस्प्रिन असेल तर पाण्यात ढवळून द्यावे. छातीवर योग्य पध्दतीने दाब देऊन जीव वाचवण्यास मदत होऊ शकते.

हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी नेहमी पुरेशी झोप, नियंत्रित रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल मदत करते. शिवाय मद्यपान, धूम्रपान कमी करणे नेहमी फायदेशीर ठरते.

-भक्ती संदिप