“संडे हो या मंडे रोज खाओ अंडे” लहानपणापासून आपण सर्वांनी हे ऐकलंय पण तुम्हाला माहिती आहे का हिवाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने खरंच किती फायदा होतो?चला तर आजच्या ह्या लेखातून जाणून घेऊया हिवाळ्यात अंडी खाण्याचे फायदे. अंडी शाकाहारात येतात की मांसाहारात ह्यावर बरेच मतभेद आहेत. असो. पण अंडी पोषकतत्वांचा खूप मोठा स्रोत आहेत हे नाकारता नाही येणार.

अंड्यांमध्ये साधारणतः 84 कॅलोरीज, 6-8.39 ग्रॅम प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन असतात. प्रोटीन,व्हिटॅमिन, ऊर्जा ह्यांनी भरपूर असणारी अंडी शरीरास थंडीपासून वाचवण्यासाठी मदत करतात.

प्रोटिनसोबतच ह्यात व्हिटॅमिन्स आणि खनिजे ही असतात. ह्यात आढळणारे व्हिटॅमिन्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे, शरीरातील पेशींचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात तर ह्यात असणारे मिनरल्स जसे की झिंक सर्दी-पडस्यापासून वाचवते तर लोह आणि आयोडीन हे रक्त आणि थायरॉईडसाठी उपयुक्त असतात.

शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी अंडी मदत करतात शिवाय केस, त्वचा ह्यांसाठी देखील उपयुक्त आहेत.स्नायूंचे उत्तम आरोग्य, ऊर्जा निर्मिती, तजेलदार चेहरा, गर्भवती स्त्रियांसाठी अंडी फार लाभदायक ठरतात.

प्रतिदिन 3 अंडी खाणे शरीरास योग्य ठरू शकतात. त्यापेक्षा जास्त अंडी एका दिवसात खाणे अपायकारक ठरू शकते. शिवाय ऍलर्जी, मधूमेह, कॅन्सर असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंड्यांचे सेवन केले पाहिजे.

अंडी निवडताना देखील पुरेशी काळजी घेतली पाहिजे. सालमोनेलाने संक्रमित अंडी फूड पॉइजनिंगचे कारण ठरतात.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)