होय मित्रांनो!, बॉलीवूड मध्ये कधी, कुठे, केंव्हा अन कसे कोणाचे नशीब चमकेल हे सांगताच येत नाही. आता हेच पहा ना. एकेकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा, कोरोना संक्रमण काळात लोकांना ऑक्सिजन सिलेंडर वाटण्यासाठी स्वतःची आवडती Royal Enfield बुलेट विकणारा तोच मुलगा आज चक्क जॉन अब्राहम सोबत त्याचाच फिल्ममध्ये हिरो म्हणून काम करत आहे. कसे ? चला जाणून घेऊ या.
‘सनम तेरी कसम’ या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता हर्षवर्धन राणे डेब्यूनंतर काही काळ अचानक गायब झाला होता. पण आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जोमात कामाला लागला आहे. एकापाठोपाठ एक अशा नव्या प्रोजेक्टवर त्याचे काम सुरू आहे. अलीकडे तो तापसी पन्नूसोबत ‘हसीन दिलरूबा’ या सिनेमात दिसला. आता लवकरच जॉन अब्राहमची निर्मिती असलेल्या एका सिनेमात त्याची वर्णी लागली आहे.
हर्षवर्धन राणे कधी काळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ‘तैश’च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये हर्षवर्धनने हा किस्सा सांगितला होता. ‘चित्रपटात येण्याआधी मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होतो. तेव्हा मी जॉन अब्राहमचे हेल्मेट डिलिव्हर केले होते. ती त्याची माझी पहिली भेट होती. ही 2004 ची गोष्ट. अर्थात आपल्याला जॉन भेटणार, हे मला ठाऊक नव्हते. मी हेल्मेटची डिलिव्हरी घेऊन पोहोचलो, तेव्हा समोर जॉन होता. जॉनने खूप प्रेमाने माझे आभार मानले होते. जॉन आपल्याला भेटला, त्याने आपल्याला थँक्यू म्हटले, यामुळे मी सुद्धा अक्षरश: हवेत होतो.’
गेल्यावर्षी करोनाची पहिली लाट आली होती तेव्हा हर्षवर्धनलासुद्धा करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याच्यावर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. देशात कोरोनाची भीषण स्थिती, रोज लाखो नवे कोरोना रूग्ण, ऑक्सिजन व बेड्सचा प्रचंड तुटवडा, लोक हतबल. ही स्थिती पाहून तो हवालदिल झाला.
गरजू लोकांच्या मदतीसाठी काय तर त्याने आपली आवडती बाईक विकायला काढली. हर्षवर्धनने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो आपल्या आवडत्या बाईकसोबत दिसला होता. ‘माझी ही बाईक विकायला मी तयार आहे.त्या पैशांतून मी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना मदत करीन…मला चांगल्या गुणवत्तेचे आॅक्सिजन कॉन्सेंट्रेटर हवे आहेत…,’ असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले होते.
सोशल मीडियावर या बाईकच्या विक्रीसाठी त्याने जाहिरात केली. आधी लोकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला. पण त्याने खरोखर बाईक विकली आणि या पैशातून काय घेतले तर ऑक्सिजन कंन्सट्रेटर. यानंतर हर्षवर्धनने बॉलिवूड डेब्यू केला होता. आता काय तर जॉनच्या सिनेमातच काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला.