मित्रांनो!, ते म्हणतात नां की, तुमच्या नशिबात नसलेले तुम्हाला कधीच मिळत नाही परंतु जे आहे ते तुम्हाला नक्की मिळतेच. तर तारक मेहता च्या ‘जेठालाल’ च्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे घडले होते. “जेठालाल” च्या भूमिकेसाठी दिलीप जोशी नव्हे, तर हे कलाकार होते निर्मात्याची पहिली पसंती, राजपाल यादवचाही आहे यात समावेश. चला तर जाणून घेऊया.

छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे, मात्र रसिकांची आवडती जोडी ठरली ती जेठालाल आणि दया. या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा होते. त्यामुळे दोघांची एकत्र धमाल रसिकांना पाहायची जणू काही सवयच झाली.

मालिकेत आता दया म्हणजे दिशा वाकानीने मालिका सोडली असली तरी आजही जेठालालला पाहून दयाची आठवण रसिक काढतात. जेठालाल भूमिका साकरणारे दिलीप जोशी यांचीही मालिकेमुळे प्रचंड चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. त्यांचे चाहते अगदी जेठालाल प्रमाणेच ख-या आयुष्यात ड्रेसिंग करताना दिसतात.

कानाकोप-यात आज दिलीप जोशी जेठालाल म्हणून प्रसिद्ध आहेत. दिलीप जोशींनी ही मालिका स्विकारली तेव्हा त्यांनी जराही अंदाजा नसेेल की ही मालिका त्यांना एक दिवस यशशिखरावर पोहचवेल.पण तुम्हाला माहिती आहे का ? जेठालाल ही भूमिका दिलीप जोशी यांना ऑफर करण्यापूर्वी ब-याच कलाकारांना यासाठी विचारणा करण्यात आली होती. अभिनेते योगेश त्रिपाठीला या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

पण त्यावेळी बिझी असल्यामुळे नकार दिला होता.आज ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत योगेश त्रिपाठी झळकत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ मधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता किकू शारदा, अली असगर,स्टॅण्डअप कॉमेडीयन एहसान कुरेशीलाही विचारणा झाली होती.

इतकेच काय तर राजपाल यादवलाही जेठालाल भूमिकेची ऑफर देण्यात आली होती मात्र सिनेमा सोडून छोट्या पडद्यावर काम करण्यास तयार नसल्याने राजपाल यादवने या भूमिकेला नकार दिला होता. या सगळ्या अभिनेत्यांनी नकार दिल्यानंतर दिलीप जोशी यांची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.आपल्या अनोख्या स्टाईलमुळेच दिलीज जोशी यांनीही भूमिका प्रचंड गाजवली आहे.